संजीव भांबोरे भंडारा
भंडारा :-भंडारा ते नागपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या वैनगंगा नदीवरील पुलाचे उद्घाटन नुकतेच झालेले त्यामुळे यावर्षी अंभोरा पर्यटन स्थळी राज्यभरातून महाशिवरात्रीनिमित्त येणाऱ्या भाविकांची गर्दी 6 मार्च 2024 ते 10 मार्च 2024 पर्यंत मोठ्या संख्येने वाढणार आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता जिल्हा प्रशासनाने पर्यटन स्थळी भाविकांकरता शासन स्तरावर विविध सोयी सवलती उपलब्ध करून देण्यात याव्यात याकरिता मोदी पुनर्वसन येथील सरपंच जयश्री विनोद वंजारी यांनी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर ,तहसीलदार भंडारा ,एसटी बस नियंत्रक कक्ष भंडारा ,यांना निवेदन देऊन संबंधित विषयावर चर्चा करून मागणी करण्यात आलेली आहे.
0 टिप्पण्या