Ticker

6/recent/ticker-posts

सहस्रकुंड येथील राम शबरी माता मंदिरातील मुर्त्या चोरीला.


लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड मो 9689821132
 हिमायतनगर -: किनवट तालुक्यातील सहस्त्रकुंड येथील श्री राम शबरी माता आश्रम सहस्त्रकुंड येथील श्रीराम सीता लक्ष्मण व शबरी मातेची मूर्ती चोरी गेल्याची धक्कादायक प्रकार दिनांक 4 रोजी मध्ये रात्रीच्या सुमारास घडला असल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून हिंदू धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा हा प्रकार अज्ञात समाज कंटकाकडून घडविण्यात आल्याची चर्चा आता राम भक्तांकडून ऐकायला मिळत आहे. दिनांक 5 रोजी सकाळी 9 वाजता येथील काही भक्त दर्शनासाठी या श्रद्धास्थानाकडे गेले असता येथील या सर्व देवी दैवताच्या मुर्त्या अचानक गायब झाल्याने या भक्तांना धक्काच बसला व थेट पोलीस स्टेशन इस्लापूरला येऊन सदरील प्रकरणी अज्ञात समाजकंटकाविरुद्ध पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करावा अशा स्वरूपाची मागणी हिंदू धर्म संघटनेच्या विविध कार्यकर्त्याकडून करण्यात आली.. विशेषता आयोध्यामध्ये श्रीरामाची प्रतिष्ठापना झाली आणि सहस्त्रकुंडची श्रीरामाची मूर्ती चोरीला गेली. ही घटना अशोभनीय असून या प्रकरणाचा तपास पोलीस प्रशासनाने करावा अशा स्वरूपाची निवेदन घटनेचे कार्यकर्ते अतुल पांडुरंग कोंनके वाढ ,विजय सुभाष फोले, गजानन दत्ता कदम, विलास कासारकर ,रोहित बोंबील वार, राजू सोळंके, गणेश मोतेवार, शिवानंद शेंडगे, सुदाम पालेपवाड , रितेश मोतेवार, ज्ञानेश्वर एलचेटवाड, सतीश राठोड ,साई बेलवाड शेख लतीफ
निलेश पिलवंड, अर्जुन सातपुते, बालाजी सातपुते, लक्ष्मण बसेवाड, सदानंद जाधव, सुभाष घोगेवाड, बालाजी जेवलेवाड, बजरंग दल व आदिवासी समाज उपस्थित 
 इत्यादी कार्यकर्त्यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या