Ticker

6/recent/ticker-posts

अनुभव शिक्षा केंद्राची कोर मीटिंग संपन्न

अर्पित वाहाणे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी वर्धा
मो 8956647004

वर्धा :- भंडारा जिल्ह्यातील मिस्किल टॅंक गार्डनमध्ये अनुभव शिक्षा केंद्राची कोर मीटिंग घेण्यात आली या मीटिंगमध्ये भंडारा जिल्ह्यातील युवकांचे नेतृत्व कशाप्रकारे विकसित करता येईल याबाबत चर्चा करण्यात आली तसेच अनुभव केंद्राची मूल्य सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता, लिंगसमभाव, प्रामाणिकपणा, उत्तरदायित्व, श्रम प्रतिष्ठा, आणि पर्यावरण सुरक्षा याविषयाला घेऊन युवकांना कशाप्रकारे एकत्र करता येईल, आणि जिल्ह्यातील विविध क्षेत्रात मुल्यांआधारीत अनुभव कट्टा स्थापन करून युवकांना प्रशिक्षण देणे याबाबत नियोजन करण्यात आले.
               तसेच अनुभव शिक्षा केंद्र भंडारा व नागपूर चे नवनियुक्त जिल्हा प्रशिक्षक मा. आकाश रामटेके यांचे संविधान प्रास्ताविका व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
               त्यावेळी ए. एस. के. चे जिल्हा अध्यक्षा कु. कौतुक मेश्राम, खजिनदार धम्मदिप मेश्राम, समीर डोंगरे, मंगेश मेश्राम, साजन घरडे,सत्यपाल तितीरमारे( सचिव) उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या