कलावंतांनी काल्पनिक पात्र रंगविण्यापेक्षा महापुरुषांच्या विचारावर कला सादर करावी आम्ही सौरक्षण देऊ
रुपाली मेश्राम कार्य संपादिका मो.९५५२०७३५३५
पुणे :-पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्र च्या विद्यार्थ्यांना अभाविप च्या गुंडांनी मारहाण केल्याच्या घटनेचा आम्ही निषेध करतो.
अभाविप ही गुंडांना पोसणारी संघटना असून सत्तेचा माज असल्याने धर्मांधांनी विद्यापीठात दहशत माजविण्याचा प्रयत्न चालवला आहे तो प्रश्न जशास तसे उत्तर देऊन हणून पाडण्यात येईल.
ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांना मारहाण करून त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला चढविण्यात आला आहे ही घटना निषेधार्ह आहे परंतु अश्या काल्पनिक पात्रांवर कला सादर करण्यापेक्षा महापुरुषांच्या विचारांचा प्रचार प्रसार करणारी कला सादर करावी धर्मांध संघटना धर्माच्या नावावर ध्रुवीकरण करण्याच्या प्रयत्नात असून अश्या घटनांमुळे धार्मिक दृष्ट्या संवेदनशील लोक एकत्र येत आहेत परिणामी झुंडशाही वाढत असल्याने महापुरुषांच्या विचारांवर कला सादर करावी त्यातून योग्य प्रहार चुकीच्या विचारांवर करता येईल याचा विचार आता लेखकांनी करायला पाहिजे अश्या कलाकृतीना आम्ही संरक्षण देऊ अशी भूमिका रिपब्लिकन विद्यार्थी सेनेची आहे.
विवेक बनसोडे ,सचिन निकम, आशिष गाडे, कुणाल भालेराव ,प्रवीण हिवराळे ,अतुल कांबळे, अविनाश कांबळे.
0 टिप्पण्या