Ticker

6/recent/ticker-posts

हर्षवर्धन जाधव लोकसभेच्या रिंगणात; पुन्हा गेल्यावेळची पुनरावृत्ती होणार ?

रुपाली डोंगरे चित्रा न्युज 
छत्रपती संभाजीनगर :-हर्षवर्धन जाधव यांच्या एन्ट्रीमुळे संभाजीनगर लोकसभा निवडणुकीत नवीन ट्विस्ट आला आहे. हर्षवर्धन जाधव यांनी मराठी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गुढी उभारून त्यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करत पुन्हा एकदा अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरणार आहेत. जाधव हे पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरल्याने संभाजीनगरची निवडणूक अधिक रंगतदार होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी 2 लाख 83 हजार 798 मत घेतल्याने चंद्रकांत खैरेंना पराभवाचा सामना करावा लागला होता. अशातच जाधव यांची पुन्हा एकदा एन्ट्री झाल्याने मागची पुनरावृत्ती होते की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार हे चंद्रकांत खैरे आहेत, तर महायुतीकडून ही जागा शिंदे गटालाच देणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या