Ticker

6/recent/ticker-posts

इलेक्शन ड्युटी रद्द करण्यासाठी बोगस मेडिकल प्रमाणपत्र; संभाजीनगरमध्ये समोर आला प्रकार



रोशन चावरे चित्रा न्युज 
छत्रपती संभाजीनगर :-लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनातील कर्मचारी, शिक्षक यांची ड्युटी लावण्यात आली आहे. परंतु निवडणुकीच्या कामाला फाटा देण्यासाठी कोण काय शक्कल लढवेल हे सांगता येत नाही. छत्रपती संभाजीनगर मध्ये इलेक्शन ड्युटी रद्द करण्यासाठी चक्क बोगस मेडिकल प्रमाणपत्रांचा आधार घेतल्याचं जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून प्रशासन कामाला लागले आहे. प्रशासनाकडून यासाठी जोरदार तयारी सुरु असून प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी बुथवरच्या कामासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये प्रशासनातील कर्मचाऱ्यांसह शिक्षकांचाही समावेश आहे. त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरवात झाली आहे. संभाजीनगर आणि जालना या मतदार संघाची निवडणुकीचे नियोजन जिल्हाधिकाऱ्यांकडे असून सध्या वीस हजार कर्मचारी निवडणूक कामात आहे. परंतु अनेकजण काहीतरी बहाणा करून प्रशिक्षणास गैरहजर राहून निवडणुकीची ड्युटी रद्द करण्याच्या प्रयत्नात आहेत. यासाठी चक्क बोगस मेडिकल सर्टीफिकेट सादर करत असल्याचे समोर आले आहे. 

तर डॉक्टरांवरही गुन्हा 

हा प्रकार लक्षात आल्याने असे प्रमाणपत्र देणाऱ्यांची तज्ञ डॉक्टर्सकडून संबंधित कर्मचाऱ्यांची तपासणी करून त्यांचे मेडिकल सर्टिफिकेट घेण्यात येईल. परंतु पडताळणी करून बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरवर देखील निवडणूक आयोग फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल; असा कडक इशारा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला आहे. तसेच गैरहजर कर्मचाऱ्यांनी खुलासा न केल्यास त्यांनाही निलंबित करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या