कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- शहिद डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रणित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती जिल्हा भंडाऱ्याच्या वतीने दिनांक 11. 4. 2024 ला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सायंकाळी 4.30 वाजता महात्मा फुले आणि त्यांचे जीवन कार्य याविषयी डॉक्टर संजय मानकर यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम म.अनिस कार्यालय भगतसिंग वाढ भंडारा येथे आयोजित केला आहे. दिनांक 14 एप्रिल 2024 ला महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आर्थिक ,धार्मिक, सामाजिक ,विषमता ,आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर म. अनिस कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे उद्घाटन द्वारका प्रसाद सारडा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कमलकिशोर लाहोटी, प्रमुख अतिथी ईश्वर काबरा, बसत मंत्री, डॉ. संजय मानकर यांच्या उपस्थितीत प्रमुख वक्ते डॉ. बबन मेश्राम, प्रा. नरेश आबिलकर, हर्षल मेश्राम, या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत तरी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आव्हान बुवाबाजी विभागाचे राज्य सहकार्य वाह विष्णुदास लोणारे प्रा. युवराज खोब्रागडे ,प्रकाश नाकतोडे ,चंद्रशेखर भिवगडे, मकबुल वारशी,नितेश बोरकर लीलाधर बनसोड, दशरथ शहारे, कैन्हाया नागपुरे ,चंद्रशेखर खोब्रागडे, पुरुषोत्तम गायधने, कोठीराम पवनकर, डॉ. नरहरी नागलवाडे सौ. कविता लोणारे, सौ. रूपाली लोणारे, त्रिवेणी वासनीक सौ. अश्विनी भिवगडे, सुषमा बनसोड सौ.माया बारापात्रे सौ.भाग्यश्री कटारे ,शहाजान बोकडे यांनी आवाहन केले.
0 टिप्पण्या