Ticker

6/recent/ticker-posts

लाखनी शहरात पोलिसांचा रुटमार्च

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज

भंडारा :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान ईद, झुलेलाल जयंती, रामनवमी त्याच प्रमाणे आगामी लोकसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी. तसेच  कोणताही अनुचित प्रकार घडू नये. या करिता सहाय्यक पोलीस अधीक्षक सुशांत सिंग यांचे मार्गदर्शनात व प्रमुख  उपस्थितीत पोलिस निरीक्षक नरेंद्र निस्वादे यांचेसह पोलिस ठाणे लाखनी चे सर्व अधिकारी, अंमलदार, राज्य राखीव पोलीस बल व आरपीएफ चे बाहेरील बंदोबस्तावरील जवान यांचे तर्फे मंगळवार(ता.९) रोजी लाखनी शहर, मुरमाडी/सावरी व पोहरा या भागात रुटमार्च करण्यात आला. यात ७ अधिकारी व ६५ अंमलदार सहभागी झाल्याचे पोलिस हवालदार सुभाष राठोड यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या