किरण जावळे चित्रा न्युज
बीड/आष्टी- मानवी जीवनात नैतिक मूल्य जपल्यास भविष्यातील यशदायी ही प्रवास सुखाचा होतो.किंबहुना पत्रकारितेचे दिव्य कर्तव्य पेलत माणुसकीचे जतन करत मूल्य संवर्धन करणारे जेष्ठ पत्रकार दैनिक झुंजारनेताचे उपसंपादक उत्तम बोडखे आणि त्यांचा परिवार सातत्याने स्नेह माणुसकी वृद्धिंगत करणारा असून त्यांच्यातील जिद्द, चिकाटी आणि परिश्रम हे गुण कौतुकास्पद आहेत! असा गौरव मुक्तकंठाने लोकनेते गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्या अध्यक्ष तथा माजी मंत्री लोकनेत्या पंकजा मुंडे यांनी केला.आष्टी येथे शनिवारी लोकनेत्या पंकजा मुंडे आणि खासदार डाॕ. प्रीतम मुंडे यांनी उपसंपादक पत्रकार उत्तम बोडखे यांच्या बोडखे प्रेसला आवर्जून सदिच्छापूर्वक भेट देत संवाद साधला.यावेळी बोडखे प्रेसच्यावतीने दोन्ही भगिनींचा यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी समता परिषदेचे आष्टी तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ बोडखे, पत्रकार उत्तम बोडखे यांच्यासह परिवारातील सदस्य उपस्थित होते. बोडखे प्रेसला गेल्या २२ वर्षांपूर्वी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी भेट दिली होती.ही आठवण यानिमित्ताने ताजी झाली. दरम्यान,संवाद साधताना लोकनेत्या पंकजा मुंडे,खासदार डाॕ. प्रीतम आणि उत्तम बोडखे यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची माणसे जपण्याची हातोटी होती.सामान्य माणसाला आपुलकी प्रेम आणि जिव्हाळ्याने जोडण्याची कला कशी विलक्षण होती.या अनुषंगाने त्यांच्या कर्तुत्वावर काही क्षण प्रकाश टाकण्यात आला.दरम्यान,त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या मौल्यवान प्रचंड ऐतिहासिक प्रवासावर वाटचाल करण्याचा आम्ही भगिनी प्रयत्न करू असा विश्वास त्यांनी दिला. बोडखे प्रेसच्या गुणवत्तेवर यावेळी चर्चा झाली.आष्टी आणि तालुक्यातील विविध गाव,वाड्या व वस्त्या आणि शहरांमध्ये सुखदुःखाच्या आनंदाच्या कार्यक्रमांमध्ये बॅनर आणि प्रिंटिंगच्या माध्यमातून अत्यंत कौशल्यपूर्ण देखणे बॅनर,पत्रिका ,सोशल मिडिया डिझाईन,सजावट करून देण्याचे एक वेगळे कौशल्य आणि हातोटी जपली असल्याचे खासदार डाॕ.प्रीतम मुंडे म्हणाल्या. यावेळी लोकनेत्या पंकजा व खासदार प्रीतम यांच्या समवेतमाजी आ.भीमराव धोंडे,समाजसेवक विजय गोल्हार,बीड जि.प.च्या माजी अध्यक्षा सविता गोल्हार,डाॕ.शैलेजा गर्जे, भाजपनेते शंकर देशमुख,पत्रकार शरद तळेकर,आण्णासाहेब साबळे,डिझाईनर आकाश डोंगरे,प्रा.गहिनीनाथ डोंगरे, भाजप आणि मित्र पक्षाचे विविध नेते कार्यकर्ते उपस्थित होते.उपसंपादक तथा ज्येष्ठ पत्रकार आणि बोडखे प्रेसचे मालक दत्ताभाऊ बोडखे यांनी लोकनेत्या पंकजाताई आणि खासदार डाॕ.प्रीतम मुंडेचे आभार मानले.
0 टिप्पण्या