बँक अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज
मोईन कादरी हिंगोली
हिंगोली: गजबजलेल्या ठिकाणी नांदेड , जालना ,बुलढाना जिल्हयातील एटीएम कटिंग करूण लाखो रुपये चोरट्याने पळवले असून सदर चोरटे पुन्हा आज उद्या नजीक एक-दोन दिवसांमध्ये आजूबाजू जिल्ह्यात एटीएम कटिंग करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वरील प्रमाणे चोरीचे सत्र सुरू असून बँक अधिकाऱ्यांनी आपल्या एटीएम सुरक्षा बाबत योग्य ते काळजी घ्यावी, प्रत्येक एटीएम वर वॉचमन नेमण्यात यावा, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, आलाराम यंत्रणा सतर्क करण्यात यावी, तसेच बँक व एटीएम वर चेकिंग रजिस्टर ठेवून सदर रजिस्टर बाबत संबंधित पोलीस स्टेशनला माहिती द्यावी जेणे करून रात्रगस्त करणारे अधिकारी व पोलीस पेट्रोलिंग वाहन सदर ठिकाणी नोंद करतील व वॉचमेन सतर्क आहे का पाहतील.
तसेच सोनार दुकानदार यांनी सुद्धा आपल्या सोन्या-चांदीच्या दुकानावर योग्य सुरक्षा यंत्रणा ठेवावी, प्रत्येकाने किंवा काही दुकानदारांनी एकत्र मिळून एक किंवा दोन वॉचमन ठेवावे, सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी. को कोणत्याही मदतीसाठी पोलीस मदतीसाठी डायल 112 किंवा पोलीस नियंत्रण कक्ष येथे संपर्क करावा, तसेच स्थानिक पोलीस स्टेशन किंवा ठाणेदार यांच्याशी सुद्धा संपर्क करावा.
हिंगोली पोलीस आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर आहेत.
0 टिप्पण्या