विठ्ठल पाटील लातूर.
लातूर :-गावच्या विकासाचे विधीमंडळ म्हणजे ग्रा.पं.सभाग्रह.आणि याच सभाग्रहातील मंडळ म्हणजे लोकांनी लोकविकासासाठी निवडुण दिलेले सरपंच,उपसरपंच व सदस्य असतात. आणि सोबतीला असतो सचीव.व या सर्वांनी जर ठरविले तर होत्याचे नव्हते अण् नव्हत्याचे होते करतात. अगदी कांहीसा असाच प्रकार मागील 2 तीन वर्षापासुन हंडरगुळी गावात होत असलेल्या विविध विकास कामा मधून दिसत आहे.
कारण रस्ते,विज,पाणी,गटारी या साध्या सोप्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरल्याने 10 वर्षाची सत्ता बदलुन विद्यमान उपसरपंचाच्या गटा ला निर्विवाद बहूमतांची सत्ता जनता, मतदार यांनी सोपवली.आणि प्रथमच सत्ता मिळताच अवघ्या कांहीच महि- ण्यानंतर रस्ते,पाणी,गटारी यासारखी कामे गल्लोगल्ली होऊ लागली.तसेच गत 10 वर्षात जेथे *BSP* बिजली, सडक व पाणी या सोप्या सुविधा गत सत्ताधा-यांनी दिल्या नव्हत्या.तेथे विद्यमान सरपंच विजय अंबेकर, उपसरपंच बालाजी भोसले व सचीव कांबळे एस.आर. या ञिमुर्तींनी सहज *BSP* बिजली,सडक,पाणु यांची सोय उप्लब्ध करुन दिल्यामुळे सर्व सामान्य जनता समाधानी दिसतात. तसेच दाखला आॅफीस पुढे गटार नव्हती म्हणुन घराघरातील घाण पाणी रोडवरुन वाहत होते.माञ या ञिमुर्तींनी जनहिताचा विचार करुन मागणी पुर्वीच ग्रा.पं.च्या 15 वा.वित्त आयोगातुन या ठिकाणी दि.29 मे रोजी जेसीबीने नालीचे काम सुरु केले असल्याने या भागातील सर्व जनतेला घाण पाण्यातुन *पायधुनी* करत ये-जा करण्याची वेळच आता येणार नाही.तसेच चांभार गल्ली,मेन मार्केट,जि.प.शाळे लगत व उदगीर रोड ते ग्रामसेवक क्वाॅटर पर्यंत तसेच दाखला आॅफीसच्या लगत असे अनेक ठिकाणी पेव्हर ब्लाॅक व सिमेंट रोड बनविले आहेत.
विशेष असे की,आचारसंहिता लागण्यापुर्वीच विविध कामांची मंजुरी व वर्क आॅर्डर मिळवुन उपसरपंचानी आचारसंहिता दरम्यान ही विविध वार्डात विकास कामे सुरुच ठेवली होती.तसेच करोडोंची कामे झाली असुन,अजुनही करोडोंच्या कामांची रितसर मागणी संबंधित मंञी महोदयांसह अधिकारी यांचे कडे केली आहे.अशी माहिती वरील *ञिमुर्तींनी*दिली आहे.व गत 2 तीन वर्षात दहा वर्षात झाली नव्हती इतकी विकास कामे गल्लीबोळात होताना दिसतात. व ही विकास कामांची सुसाट धावत जाणारी बुलेट ट्रेन तसेच सरपंच , उप सरपंच व ग्राविअ या ञिमुर्तींच्या कामांची पध्दत पाहता जनता खुष व समाधानी दिसत आहे.
मागच्या दहा वर्षाच्या काळात जे साधी,सोपी कामे झाली नव्हती ती व मोठी अवघडशी विकास कामे आजी सत्ताधारी मंडळ करत आहेत.आणि जनता समाधानी आहे.असे मत या प्रतिनिधीं जवळ बोलताना एम. चौधरी, अनिल जाधव,चिंतलवार बी. यांनी व्यक्त केले आहे..


0 टिप्पण्या