सोनू संजीव क्षेत्रे चित्रा
ठाणे :-स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय दीपक कांबळे सर आणि मुख्य महासचिव मा. कमलेश शेवाळे सर यांच्या मार्गदर्शनानुसार मुंबईतील घाटकोपर पार्शिवाडी येथील हर्ष ट्युटोरियल्स मध्ये मुलांना ऑनलाइन रिझल्ट पाहण्यासाठी मुंबई अध्यक्षा सविता तावरे, मुंबई प्रभारी मालतेश हेब्बारे सर आणि कैलाश सर यांनी मदत केली. नंतर सर्व उत्तीर्ण मुलांना पुष्पगुच्छ, सर्टिफिकेट आणि चॉकलेट देऊन सन्मानीत करण्यात आले. तर काल मुंबई संघटक वैशाली कांबळे ताई यांनी मानखुर्द चिता कॅम्प येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या परिस्थितीशी दोन हात करत शिकणाऱ्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संघटनेचे सर्टिफिकेट देऊन प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच संध्याकाळी पाच वाजता मानखुर्द, महाराष्ट्र नगर, कन्स्ट्रक्शन साईट येथे देखील वैशाली कांबळे आणि मानखुर्द तालुका सहसचिव संध्याराणी बिरादर यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संघटनेचे सर्टिफिकेट देऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून सत्कार केला आणि पुढील भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. काही विद्यार्थ्यांचे पालकही यामध्ये सहभागी झाले होते. आपल्या मुलांचा सत्कार होताना पाहून त्यांनाही खूप आनंद होत होता. मुलांना मिळालेल्या यशाची संघटनेने घेतलेली दखल पाहून त्यांनीही स्वराज्य संघटनेचे आभार मानले आणि कार्यक्रमाला अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला.


0 टिप्पण्या