मोहन जगजेकर चित्रा न्युज
बुलढाणा :-चिखली तालुक्यातील सोमठाना येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चे टिन पत्रे उडवून गेले मात्र शाळा बंद असल्यामुळे कोणालाही जीवित हानी झाली नाही.दुसरी कडे चिखली तालुक्यातील भरोसा- देऊळगाव घुबे येथील रस्त्यावर दहा ते पंधरा झाडे रस्तावर पडल्यामुळ काही तास वाहतूक ठप्प झाली. नंतर रस्तावर पडलेले झाडे बाजूला करून वाहने वाहतूक सुरळीत सुरू झाली.आज परत दुपारी एकदा चिखली तालुका मध्ये काही गावात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला.त्यात चिखली तालुक्यातील गांगलगाव या सह परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसाने हजरी लावली.
अनेक शेतकऱ्याचे शेतातील झाडे पडले.तर काही घरा वरील टिन पत्रे उडवून गेले. गांगल गाव येथील अनिल हरीचंद्र म्हस्के यांचे गांगलगाव शिवारातील असलेल्या गुरांचा गोठा वरील सर्व टिन पत्रे उडवून आहेत. त्या ठिकाणी अवकाळी पावसामुळे कोणतेही जीवित हानी झाली नाही.तत्काळ पंचनामे करण्याचे आव्हान तिथेल शेतकरी करत आहे.
0 टिप्पण्या