विजय चौडेकर चित्रा न्युज
नांदेड -:ग्राम पंचायत चा कारभार गोंधळलेला असतो निधीचा विनियोग केला जातो असे बरेचदा वर्तमान पत्रात वाचायला मिळते आणि असं प्रत्यक्षात घडतंच असतं काही ग्राम पंचायती,, लहान,तर काही मोठ्या असतात त्यांच्या लोक संखे प्रमाणे निधी शासनाकडून मिळतो, सरपंच, ग्राम सेवक,हे लोक काम फक्त कागदावर दाखवून निधी गबन करतात पाच वर्षांत एखादं कामं केलेलं असतं बाकी सगळी बोंबाबोंब, चौदावा वित्त आयोग, पंधरावा वित्त आयोग,, या मार्फत विकास कामे केली जातात, फक्त,10 टक्के ग्रामपंचायती सोडल्या तर बाकी 90 टक्के ग्रामपंचायती निधी ची विल्हेवाट लावण्यावरच असतात ना रस्ता,ना नाली,ना दलित वस्ती सुधार,ना निर्मळ जल योजना,शूध्द पाणीपुरवठा योजना, संडास, शोषखड्डे योजना, कोणतेही काम न करता बिल उचलुन घेणे लाखों रूपयाचा घोटाळा हा खेळ बर्याच ग्राम पंचायत मध्ये चालू आहे, त्यांना विचारणार कोण? किती ही तक्रार वरिष्ठांकडे केली, तरी कधी चौकशी झाली नाही, सामाजिक कार्यकर्ता, विजय चौडेकर, यांनी वेळोवेळी वरिष्ठांशी चर्चा केली, कित्येकदा पेपर ला बातमी लावली,काहीच उपयोग झाला नाही,जर तहसीलदार, जिल्हाधिकारी साहेबांनी लक्ष घालून चौकशी करावी प्रत्येक वर्षी लोखोचा घोटाळा उघडकीस येईल, काही प्रमाणात का होईना विकास कामे केली जातील, वचक निर्माण होईल,, ग्राम पंचायत मध्ये जो कारभार चालतो तो किती पारदर्शक आहे, हे पाहण्यासाठी चौकशी समिती नेमली जावी, अशी मागणी जनतेतुन होत आहे,
0 टिप्पण्या