काशिनाथ नाटकर वसमत
वसमत: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे प्रकल्प अधिकारी सिध्दार्थ गोंवदे यांच्या मार्गदर्शनाखाली समतादूत आळणे मिलिंद व गुरुनाथ गाडेकर यांनी राष्ट्रमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनानिमित्त प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून , जिवण कार्यावर प्रकाश टाकला व समाज कल्याण , सामाजिक न्याय विभाग योजना या विषयी प्रबोधन करण्यात आले .
यावेळी अध्यक्षस्थानी :- डॉ. सुधीर मुलगीर साहेब ( पोत्रेकर )
यावेळी प्रमुख पाहूणे :- उत्तमराव ठोंबरे मामा , विठ्ठल पडोळे ( मुडीकर )
छत्रपती शिवरायांचे सुराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणा-या, अर्ध्या अधीक भारत देशावर २८-३० वर्ष लोककल्याणकारी राज्य करणा-या, प्रजावत्सल, न्यायप्रीय, पुरोगामी विचारसरणीच्या, जगात सर्वाधीक दान-धर्म करणा-या, कायम लोककल्याणाची कामे सुरू ठेवून बेरोजगारांच्या हाताला काम देउन, त्यांच्या जगण्याची व जिवनाची काळजी करणा-या, माणसांप्रमाणेच प्राणीमात्रांची व पशुपक्षांचीही काळजी करणा-या, जागतीक किर्तीच्या महिला राज्यकर्त्या होत्या .
पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी जन्म झाला. महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या गावात अहिल्याबाई होळकरांचा जन्म झाला. अहिल्याबाई होळकर यांनी महिला सक्षमीकरण आणि समाज कल्याणासाठी काम केले. धार्मिक सहिष्णुता वाढवण्यात योगदान दिले आणि विविध समुदायांमध्ये एकोपा वाढवणे हा नेहमीच त्यांचा प्रयत्न होता. ज्या काळात स्त्रियांना शाळेत जाण्याची परवानगी नव्हती, तेव्हा अहिल्याबाईंच्या वडिलांनी त्यांना लिहायला आणि वाचायला शिकवलं. अशा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
यावेळी सर्व उपस्थित शंभुराजे मल्टीसर्विसेस वसमत चे प्रो. प्रा. शुभम कदम पिंपराळकर , रजनीकांत कमळू , करण जाधव , मिलिंद आळणे , युवराज सूर्यवंशी , गुरुनाथ गाडेकर , नागनाथ खुळखुळे , विलास भाकरे , अमोल साखरे , विट्ठल पड़ोळे, आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आभार प्रदर्शन रजनीकांत कमळू यांनी केले .
0 टिप्पण्या