Ticker

6/recent/ticker-posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती तथागत ग्रुपच्यावतिने मोठ्या उत्सहात साजरी..!


रुपाली मेश्राम चित्रा न्युज 
मेहकर :  डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाटीका मेहकर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व तथागत गौतम बुद्ध यांच्या चरणी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहून सर्वाना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. व भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार बोधिसत्व, महामानव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचे पूजन करून त्यांना अभिवादन तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिपभाऊ गवई यांनी केले. याप्रसंगी आपले विचार व्यक्त करताना बोलत होते, माई तुमच्या कर्तव्यनिष्ठतेला मानाचा मुजरा इथल्या मनुवादी व्यवस्थेने स्त्री ला चुल आणि मुल या पलीकडे त्यांचे अस्तित्व नसते असे सांगितले होते अशा काळामध्ये हातामध्ये तलवार घेऊन आपल्या बुद्धी व मनगटाच्या जोरावर उत्तम राज्य कारभार ज्यांनी केला. ज्याच्या मनगटात बळ, बुध्दीमध्ये चार्तुय व मस्तकात क्रांतीची ज्वाला आहे तोच खरा लोककल्याणकारी राजा बनू शकतो हे सत्य ठरवत लोकमाता अहिल्यामाई होळकर यांनी अन्यायकारी मनुवादी धर्मव्यवस्थेच्या विरोधात जाऊन पतीच्या निधनानंतर सती न जाता हातात तलवार घेऊन राज्य कारभार केला. त्यांच्या राज्यात पेशवाईला थारा नव्हता म्हणून प्रत्येकाला न्याय मिळत होता. या पद्धतीने मानवतावाद हा केंद्रबिंदू ठेवून लोककल्याणकारी राज्यकारभार करणाऱ्या लोकमाता अहिल्याबाई होळकर होत्या असे मत संदिपभाऊ गवई यांनी व्यक्त केले..

यावेळी तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिपभाऊ गवई, कुणाल माने, राधेशाम खरात, गौतमदादा पैठणे तसेच समस्त पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या