• प्रशिक्षणाला मुलामुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा:- शिवणी/बांध एडवेंचर स्पोर्टस क्लब चे वतीने शिवणी/बांध जलाशयात १९ मे ते २६ मे २०२४ या कालावधीत जलतरण प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. जलतरण शिकण्यासाठी मुलामुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला असून या प्रशिक्षणाकरिता शंभराहून अधिक मुलामुलींनी नोंदणी करून हजेरी लावली असून प्रशिक्षणा दरम्यान प्रशिक्षणार्थीचा उत्साह शिगेला पोहचला असल्याचे चित्र प्रशिक्षण स्थळी दिसून येत होते.
ग्रामीण परिसरात नदी, नाले व तलावांची संख्या अधिक असते. पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होऊन अनेकांचा मृत्यू होतो. यावर मात करता यावी तसेच जलतरणाचे माध्यमातून विद्यार्थी विद्यार्थीनीमध्ये आवड निर्माण व्हावी व जलतरणाचे माध्यमातून आवश्यक तो व्यायामही व्हावा. या उद्देशाने शिवणी/बांध एडवेंचर स्पोर्टस क्लब चे वतीने शिवणी/बांध जलाशयात जलतरण प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली. संघटनेचे डॉ. चंद्रकांत निंबार्ते, राजेश बांते, कैलास लुटे, मारुती भुरे, परसराम फेंडरकर सर्व राहणार लाखनी, ऍड. मनीष कापगते, जनार्दन दोनोडे, राजेश ढोमने, धनंजय हेडाऊ सर्व राहणार साकोली. तसेच महिला जलतरण प्रशिक्षक देवश्री मनीष कापगते हे रविवार(ता.१९मे) पासून दररोज सकाळी ६:०० ते ८:०० वाजता पर्यंत प्रशिक्षण देत आहेत. लहानापासून तर मोठ्यापर्यंत जलतरण शिकण्यासाठी शिवणी/बांध जलाशयात सकाळी एकच गर्दी होत असते. त्यामुळे हे पिकनिक स्पॉट तर नाही ना. असा जाणाऱ्या येणाऱ्यांचा समाज होत असल्याचे प्रशिक्षकांनी सांगितले.
0 टिप्पण्या