Ticker

6/recent/ticker-posts

विहिरीत पडलेल्या बिबटाचा वन विभागामार्फत रेस्क्यू


कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज 
भंडारा:- सहवनक्षेत्र दिघोरी/मोठी अंतर्गत वनरक्षक बीट दहेगाव नियतक्षेत्र पारडी येथील विजय ताराम यांचे शेतातील विहिरीत पडलेल्या बिबटाला वन विभागामार्फत रेस्क्यू केल्याची घटना रविवार(ता.१९मे) रोजी दुपारी ३:०० वाजता दरम्यान एनएनटीआर तथा आरआरटी पथकाने रेस्क्यू केल्याची माहिती उघडकीस आली आहे.
                   वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय लाखांदूर चे अधिनस्त सहवनक्षेत्र दिघोरी/मोठी अंतर्गत वनरक्षक बीट दहेगाव नियतक्षेत्र पारडी येथे अल्पभूधारक शेतकरी विजय ताराम यांचे वन क्षेत्रालगत शेतातच वास्तव्य आहे. कुटुंबियांचे पिण्याचे पाण्याची तसेच सिंचनाची सोय व्हावी. या करिता त्यांनी विहिरीचे बांधकाम केले आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून वनक्षेत्रातील जलस्त्रोत कोरडे पडल्यामुळे वन्यप्राणी पाण्याचे शोधार्थ लोकवस्तीचा आश्रय घेत असतात. शनिवारी(ता.१८) रोजी रात्री दरम्यान शिकार अथवा पाण्याचे शोधार्थ आलेला बिबट विहिरीला तोंडी नसल्यामुळे विहिरीत पडला असावा. रविवारी सकाळचे सुमारास कुटुंबातील महिला विहिरीतून पाणी काढण्यासाठी गेली असता बिबट विहिरीत पडला असल्याचे दिसून आले. कुटुंबीयांसह वनपरिक्षेत्र अधिकारी लाखांदूर यांना घटनेची माहिती देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून वन परिक्षेत्र अधिकारी रुपेश राऊत यांनी वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देऊन एनएनटीआर व आरआरटी रेस्क्यू चमुंना पाचारण करण्यात आले. सहाय्यक वन संरक्षक रोशन राठोड यांचे मार्गदर्शनात वन परिक्षेत्र अधिकारी रुपेश राऊत, पिंपळगाव चे क्षेत्र सहाय्यक आर.आर. दुनेदार, साकोली चे क्षेत्र सहाय्यक सुनील खांडेकर, बीट रक्षक एस. डी . खंडागळे, वनरक्षक राकेश मेश्राम, जी.डी. हात्ते, बी.एस. पाटील, नवनाथ नागरगोचे, अजय गायकवाड, गुलाब पवडे, अनिल सावसागडे, वनरक्षक स्वाती मुंडे, जयश्री गरपडे आणि हंगामी वन मजुरांच्या अथक परिश्रमानंतर बिबटाला विहिरीतून सुखरूप बाहेर काढून निसर्गाचे सानिध्यात सोडण्यात आले. रेस्क्यू दरम्यान बघ्यांची खूपच गर्दी झाली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या