अर्पित वाहाणे चित्रा न्यूज
अमरावती :- बौद्ध समाजात विशेषता आंबेडकरी कुटुंबात जन्माला येणे म्हणजे सामाजिक सेवा करणे हा त्याचा पहिला धर्म आहे, लोक आप आपापल्या पद्धतने सेवा करतात, खरं म्हणजे आजच्या काळात समाज सेवा ही बोटावर मोजण्या इतकेच लोक करतात, आणि या भ्रष्टाचाराच्या काळात समाजसेवेला खूप खुप महत्त्व आल आहे. अशातच आमचे आंबेडकरी चळवळीचे निष्ठावान सच्चे कार्यकर्ते, आंबेडकरी चळवळीचा एक बुलंद आवाज, समाजावर वाईट वेळ आल्यास खरा ब्रिगेड, आमचे मार्गदर्शक मिलिंदभाऊ दामोधरे त्यांची समाजासाठी सेवा निस्वार्थ सेवा आहे. खरंतर रक्तदानात त्यांनी स्वतःला वाहून घेतले, गेल्या वीस वर्षात ३५ वेळा गरजू रुग्णांना रक्तदान केले, मग फक्त स्वतःच रक्तदान करणे एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर रक्तदान शिबिरं वारंवार आयोजित करून एक प्रकारे रक्तदानाची चळवळ ते चालवतात. मिलिंदभाऊ दामोदरे फक्त रक्तदानावरच थांबत नाहीत तर ते म्हणतात ये आंबेडकरी खून समाजसेवा के लिए है म्हणून सातत्याने आंबेडकरी चळवळीत काम करत असताना समाजाच्या पाठीशी उभ राहून समाजाच्या हक्कासाठी आंदोलने,उपोषण मोर्चामध्ये सामील होऊन हि सामाजिक बांधिलकीची जबाबदारी कटीबद्धतीने पार पाडत आले म्हणून आज अमरावती शहरत त्यांच्या सामाजिक कार्यातून त्यांची प्रतिष्ठा उंचावरच पोहचली, आंबेडकरी चळवळीत जिद्दीने सातत्याने प्रामाणिकपणे काम करून त्यांनी त्यांची एक आगळी वेगळी ओळख निर्माण. मला आठवते मी एकदा अमरावती शहरात गेलो होतो मला मिलिंदभाऊ भेटले आणि कार्यकर्ता म्हणून त्यांच्या टू व्हीलर गाडीवर शेगाव नाका गाडगे नगर पंचवटी चौक ते राजापेठ इथपर्यंत आमचा प्रवास होता वाटेतून जात असताना मिलिंद भाऊला प्रत्येक जण जय भीम मिलिंदभाऊ असे म्हणत होते, त्यावेळी मलाही अभिमान वाटत होता मी मिलिंद भाऊला म्हणालो इतक्या दाट गर्दीच्या शहरात ठीक ठिकाणी तुमची ओळख हे कसं, ते म्हणाले डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या आंबेडकरी चळवळीत काम करत करत ही ओळख मला मिळाली. मिलिंद भाऊ दामोधरे हे आंबेडकरी चळवळीतील ग्रेट कार्यकर्ते आहेत, त्यांच्या या लढवय्या, प्रेमळ सामाजिक कार्यात त्यांच्या पत्नी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहतात. अशा सामाजिक, लढवय्या, ब्रिगेड, अमरावती शहराच्या लाडक्या कार्यकर्त्याला त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला दीर्घायुष्याच्या मंगलमय शुभेच्छा.


0 टिप्पण्या