Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्र संतांची संकल्पना रूजविल्यास शिबिर महत्त्वाचे - प्राचार्य एस एस भांडारकर

संस्कार शिबीराचा समारोपय कार्यक्रम संपन्न



संजीव भांबोरे भंडारा 
भंडारा :- स्पर्धेच्या युगात वावरत असतांना बहुतेक जण मोबाईलच्या अधिन झालेले आहेत. मोबाईलमुळे 
अवघड असणारे काम सोपे झाले आहे. त्याचा उपयोग चांगल्या व ठराविक कामांकरिता करावे. विद्यार्थ्यांच्या बालमनावर आदर्शाचे धडे गिरविणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी योग-प्राणायाम, विविध गोष्टी, स्मरण शक्ती क्रिडा प्रकारच्या माध्यमातून विकास होण्यास मदत होत असते. त्याचबरोबर नातेवाईक - भारतीय संस्कृती, विविध संस्काराचे धडे देण्यासाठी आणि राष्ट्र निर्मितीची संकल्पना साकार करण्यासाठी अशाप्रकारे संस्कार शिबिर महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन विनोद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एस एस भांडारकर यांनी केले.
          ते सिल्ली येथील विनोद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात संस्कार चळवळ व गांधी विचार मंच भंडारा, समीर वर्ल्ड कॉम्पुटर एज्यूकेशन, दि अर्बन को- ऑपरेटिव्ह बॅक भंडारा यांच्या वतीने आयोजित दहा दिवशीच संस्कार शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना बोलत होते. 
        शिबिर समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिल्ली येथील सरपंच सुचिता पडोळे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून भंडारा पंचायत समितीचे उपसभापती प्रशांत खोब्रागडे, शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त राहुल मेश्राम, विनोद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एस एस भांडारकर, संस्कार शिबिर प्रमुख विलास केजरकर, समीर वर्ल्ड कॉम्पुटर एज्यूकेशनचे संचालक समीर नवाज, शिबिर सहप्रमुख यशवंत बिरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 
          संस्कार शिबिरात योग शिक्षक यशवंत बिरे यांनी योग- प्राणायाम व कचऱ्यातून कला, शाहीर कार्तिक मेश्राम यांनी संस्काराचे मूल्य रूजविण्याच्या संदर्भात, राज्य सहसचिव विष्णुदास लोणारे - अंधश्रद्धा निर्मूलन, रमेशचंद्र गजभिये -स्पर्धा परिक्षेची तयारी, चंद्रकला निखारे व प्रा. नरेश आंबिलकर- बोधकथा, प्रदिप काटेखाये- संस्कार शिबिर व आदर्श विद्यार्थी, समीर नवाज- संगणक व आजचा विद्यार्थी, विलास केजरकर -संस्कार गिते, रत्नेश कोहरू, गणेश सार्वे व अंकुश हलमारे यांनी आपत्ती व्यवस्थापन या विषयावर, आर. सी. रामटेके यांनी पक्षी निरीक्षण, निती आयोग समितीचे माजी सदस्य अविल बोरकर यांनी पाणी बचत व जैव विविधता, सुचिता पडोळे -चांगल्या सवयी, विविध मार्मिक उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले.
           उपस्थित मान्यवरांचे आंनदायी पध्दतीने व पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
        दहा सात दिवशीय संस्कार शिबिरात विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यावेळी उत्कृष्ट शिबिरार्थी म्हणून वेदांती गभणे, श्रावणी पडोळे, जिया देशमुख, प्रतिक साखरवाडे, श्रृती गभणे, प्रांजल आकरे व वेदांती गभणे ही शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाल्याने हिला मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व शिबिरार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
             उपस्थितांनी विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.
        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीश  चांदेकर व प्रास्ताविक संस्कार सहप्रमुख यशवंत बिरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार समीर नवाज यांनी मानले.
      संस्कार शिबिराच्या यशस्वीतेसाठी  सांची सुखदेवे, प्राजक्ता ढुके, वैष्णवी बागडे, नैताली पारधी, संवेदना पडोळे,  वेदांत गभणे, श्रावणी गिऱ्हेपुंजे, पूर्वी हेडाऊ, पूर्वेश गिऱ्हेपुंजे, आराध्या लखडे, सोहम मस्के, मयुरी आकरे, मृन्मय साखरवाडे, नक्षत्र चोपकर, स्वरा सुखदेवे, वेदांती आकरे, रुचिता साखरवाडे, श्रावणी पडोळे, शरयु तिडके, पाखी पडोळे, निती पारधी, खियान साखरवाडे, आदित्य खंदे, 
क्रिष्णा साखरवाडे, सुग्रा गिऱ्हेपुंजे, त्रिशा साखरवाडे, वंश गभणे, शिवम साखरवाडे इत्यादी संस्कार शिबिरातील विद्यार्थी - विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या