संघदीप मेश्राम चित्रा न्युज
नागपूर :-राज्यासह देशाच्या हवामानात गेल्या दोन आठवड्यांपासून मोठा बदल झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागात तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. हवामान विभागाने अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भात पुढील 24 तासांत अवकाळी पावसाची शक्यता कायम आहे.
पुढील 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. कोकणातील काही भागात उष्णतेची लाट आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये रात्री तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
यामध्ये ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेडमध्ये उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. तर कोकणातील तुरळक भागात उष्ण आणि दमट परिस्थिती राहिल. शिवाय पुढील 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरात आकाश निरभ्र राहणार आहे.
0 टिप्पण्या