Ticker

6/recent/ticker-posts

आरटीईच्या प्रवेश अर्जाची संख्या ८० टक्क्यांनी घटली; यंदा फक्त ४ हजार अर्ज


हर्षवर्धन देशभ्रतार चित्रा न्युज 
छत्रपती संभाजीनगर:-जिल्ह्यात आरटीईच्या मोफत प्रवेश अर्जाची संख्या तब्बल ८० टक्क्यांनी घटली आहे. गतवर्षी जिल्ह्यात आरटीई प्रवेशाच्या चार हजार जागांसाठी तब्बल २० हजार पालकांनी अर्ज दाखल केले होते. यंदा मंगळवारी मुदत संपेपर्यंत केवळ ३८२५ पालकांनीच अर्ज भरले आहेत. आरटीईच्या नियमात बदल झाल्याने पालकांनी त्याकडे पाठ फिरविल्याची चर्चा आहे.

देशात २००९ सालापासून बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा लागू करण्यात आला. या अंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागांवर वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना मोफत प्रवेश दिले जातात. या २५ टक्के विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क शासनाकडून संबंधित शाळांना अदा केले जाते. त्यामुळे आरटीईच्या जागांसाठी क्षमतेच्या कित्येक पटींनी जास्त अर्ज दाखल होतात. 

१० मे पर्यंत मुदतवाढ 

शिक्षण विभागाने आरटीई प्रवेश नोंदणीसाठी १० मे पर्यंत मुदवाढ दिली आहे. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी तशा सूचना दिल्या आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या