राकेश आसोले चित्रा न्युज
जालना:- महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज झाले.
जालना येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, आदींसह स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार व नागरिक, उपस्थित होते.
प्रारंभी ध्वजारोहण झाल्यानंतर पोलीस दलाच्यावतीने राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करण्यात आले व राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. यानंतर पालकमंत्री यांनी पोलीस परेडचे निरीक्षण केले. यावेळी पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल, गृहरक्षक दल, महिला पोलीस दल, होमगार्ड, पोलीस श्वान पथक आदींनी पथसंचलन केले. यांनतर श्री. सावे यांनी शुभेच्छासंदेशाव्दारे जिल्ह्यातील जनतेला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या