Ticker

6/recent/ticker-posts

मोर्शी शहरांमध्ये प्रौढ बीसीजी लसीकरण सर्वेक्षण मोहीम

             
रोशन चावरे चित्रा न्युज 
अमरावती :-माननीय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पोतदार सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रौढ बी सी जी सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे.सदर मोहिमेमध्ये शहरांमधील 18 वर्षावरील सर्व लोकांची माहिती गोळा करण्यात येत आहे.यामध्ये पात्र असणाऱ्या लोकांना बीसीजी लस देण्यात येणार आहे.यामध्ये स्वयंघोषित धूम्रपान करणारे मधुमेह असणारे मागील पाच वर्षामागील पाच वर्षातील क्षय रुग्ण तसेच क्षय रुग्णाचे सहवासित इत्यादी सर्व 18 वर्षावरील नागरिक या लसीकरिता पात्र ठरणार आहेत.याकरिता जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी बीसीजी लस टोचून घेण्याचे आवाहन उपजिल्हा रुग्णालय  मोर्शी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रमोदजी पोतदार सर यांनी केले आहे.
            सदर मोहिमेमध्ये श्रीराम नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे.तसेच सदर मोहीम यशस्वी करण्याकरिता उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथील कर्मचारी श्री. अमोल झाडे, श्री. रितेश पुंड, श्री. विनय शेलुरे, श्री. प्रशांत बेहरे तसेच श्रीमती जयश्री मोरे मोहीम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या