रुपाली मेश्राम चित्रा न्युज
अमरावती :-शेकडो वर्षांपासून समाजात सिकलसेल रुग्ण त्यांच्या शारीरिक वेदनेने तळमळत होता.आजपर्य़त ह्या आजाराव साहीत्यांचे निर्माण झाले नाही.सिकलसेल आजाराविषयी अनभिज्ञ समाज पुढील पिढीला नकळत हा आजार पसरवत आहे.हया पुस्तकात सिकलसेल आजार काय आहे.त्याचा इतिहास,लक्षणे,त्यावर उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले आहे.तसेच समाजातील पुढील पिढीला.हा आजार होऊ नये यासाठी कोणते कायम स्वरुपी उपाय आहेत याबाबत माहिती दिली आहे.तसेच सिकलसेल रुग्णांचा जिवन संघर्ष त्यांच्याच शब्दांत व्यक्त केले आहे.
*या मरणप्राय आजारातुन, शारीरिक मानसिक आणि आर्थिक दुःखात लोटणा-या आजाराच्या जनजागृती साठी,हा आमच्या ऐतिहासिक पहीला प्रयत्न आहे.सदर कार्यक्रमाला उपस्थित राहून सिकलसेल मुक्तीच्या लढ्यात सहभागी व्हा ही विनंती
0 टिप्पण्या