रुपाली डोंगरे चित्रा न्युज
छत्रपती संभाजीनगर:-तिसगाव परिसरात मुलीसोबत दुध आणण्यासाठी निघालेल्या वृद्धेच्या गळ्यातून ९० हजाराची सोनसाखळी हिसकाविण्यात आली आहे.
या प्रकरणात एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, मिना पुरूषोत्तम खंडेलवाल (वय ६४, रा. कासलीवाल फ्लोरा, एस क्लब) या १७ मे रोजी सकाळी ७.१५ वाजेच्या दरम्यान त्याची मुलीसोबत दुध आणण्यासाठी घरातून पायी निघाल्या होत्या. म्हाडा चौकात मिना खंडेलवाल यांनी दुध घेतले. हे दोघे परत येत असता, कासलीवाल फ्लोराच्या जवळच सकाळी ७.३० वाजेच्या दरम्यान समोरून एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून दोन ३० ते ३५ वर्षाचे दोन व्यक्ती आले.
या दोघांमधील दुचाकी चालविणाऱ्याने हेल्मेट घातले होते. तसेच मागे बसलेलया व्यक्तीने तोडावर रूमाल बांधला होता. दुचाकीवरून आलेल्यांनी मिना खंडेलवाल यांच्यासमोर दुचाकी आणली. या दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीने मिना खंडेलवाल यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन हिसकावून पळ काढला. या दुचाकीचा नंबर प्लेटही नव्हता. ही घटना १७ मे रोजी सकाळी ७.३० वाजेच्या दरम्यान म्हाडा चौक, एएस क्लब चे जवळ घडली. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यता आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरिक्षक पाथरकर यांच्याकडे देण्यात आला आहे.
0 टिप्पण्या