Ticker

6/recent/ticker-posts

छञपती संभाजीनगर येथील ट्रान्समिशन ह्या कंपनीत ITI काॅलेजमधील 18 विद्यार्थाची निवड झाली.


 पंकज पाटील जळगाव 

 जळगाव :- जळगाव जिह्यातील अमळनेर   शहरातील वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI) मध्ये दि 17 रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
             या मेळाव्यातील निवड झालेले पहिले 18 विद्यार्थ्यांची बॅच मधील इलेक्ट्रिशियन, फिटर, संभाजी नगर (औरंगाबाद) येथील धूत ट्रान्समिशन ह्या कंपनी मध्ये आज हजर होण्यासाठी कंपनीने पाठवलेल्या गाडी मध्ये रवाना झाले. या प्रसंगी विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी संस्थेचे चेअरमन श्री चंद्रकांत भदाणे सर हजर होते. त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी संचालक धनःश्याम भदाणे, ITI चे प्राचार्य श्री प्रकाश पाटील सर, प्रमोद पाटील, सचिन माळी, सुनिल मगरे, विजय चौधरी, व सर्व कर्मचारी वृंद व पालक विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या