Ticker

6/recent/ticker-posts

हाळी गावात नाल्या तुंबल्याने दुर्गंधी अन् डासांचे प्रमाण वाढले; नागरिकांचे आरोग्य धोक्यात..!

गावपुढा-यांच्या बाबतीत हाळीकर म्हणतात "एक ना धड भाराभर चिंध्या" 


विठ्ठल पाटील लातूर 
लातूर :-उदगीर तालुक्यातील हाळी गावातील नाल्या तुंबल्या असून काही भागात गटारी काठोकाठ भरल्या आहेत. त्यामुळे  दुर्गंधी अन् डासांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी  नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.  ग्रामपंचायतीने याकडे लक्ष घालून पावसाळ्या पूर्वी नालेसफाई करावी अशी मागणी होत आहे. वेळोवेळी सांगूनही याकडे ग्रामपंचायतीची डोळेझाक होत  असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
                             पंधरा सदस्य असलेल्या हाळी ग्रामपंचायतीच्या गत निवडणुकीत विकासकामांच्या मुद्यावरून  सत्ता परिवर्तन झाले. सुरूवातीच्या काळात विकासकामांच्या बाबतीत ग्रामपंचायतीने पाऊल टाकत गल्लीबोळात पेवर ब्लाॅक बसवले. पथदिवे लावले.असे असले तरी पाणी प्रश्न व नालेसफाईकडे मात्र अद्याप दुर्लक्ष आहे. त्यामुळे गावातील गटारी तुंबल्या आहेत. गावातील मुख्य रस्ता, साठे नगर, भीम नगर, महेबुब नगर, वेस गल्ली या भागात नाल्या स्वच्छतेची समस्या जैसे थे आहे. वर्षभरापूर्वी थातूरमातूर सफाई झाली. अगोदरच तुंबलेल्या गटारी अन् त्यात शिळे अन्न, कचरा,कॅरिबॅग ई. नागरिक टाकत असल्याने दुर्गंधी पसरत आहे. डासांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या ग्रामसभेत ठरावही घेऊन तो कागदावरच असल्याचे बोलले जात आहे. पावसापूर्वी नाल्यांची सफाई न झाल्यास ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कामासाठी मजूर मिळत नसल्याचे कारण ग्रा.पं.नी देऊ नये . तसेच गावातील सर्वपक्षीय पदाधिकारी व पुढारी यांच्याबद्दल ए"एक ना धड भाराभर चिंध्या" से पॅंथर एन.डी. मसुरे,इतिहास कांबळे म्हणाले.
आजही घोटभर पाण्यासाठी हाळीची जनता हंडरगुळीत हिंडताना दिसते.हे कमी म्हणुन की,काय गावभर तुंबलेल्या गटारी व यामुळे पसरलेली दुर्घंधी व यातुन वाढलेली डासांची पैदास.यामुळे जनतेच्या जिवाचे कांही बरेवाईट झाले तर याला कोण जबाबदार आहे?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या