▪ नायब तहसीलदार धकाते यांची कारवाई
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- वैनगंगा व चुलबंद नदी घाटातून अवैधरित्या रेतीचा उपसा करून ट्रॅक्टरने वाहतूक करताना २ ट्रॅक्टर पकडण्यात आले. ही कारवाई लाखांदूर चे नायब तहसीलदार धकाते यांनी केली आहे. मनोज कोरडे रा. डांभेविरली, तालुका लाखांदूर आणि व नंदू ठाकरे रा. आथली, तालुका लाखांदूर यांचे रेतीने भरलेली २ ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करण्यात आल्याने रेती तस्करांचे धाबे दणाणले असून या दोन्ही ट्रॅक्टर मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची विश्वसनीय वृत्त आहे.
लाखांदूर तालुक्यातून चुलबंद व वैनगंगा नदी प्रवाहित होत असून जीवनदायिनी आहे. या नदयांच्या पात्रातील रेती पांढरी शुभ्र व बारीक असल्याने बांधकाम व्यवसायात प्रचंड प्रमाणात मागणी असल्यामुळे या नदयाच्या रेती घाटातून रेतीचे सुमारास मोठ्या प्रमाणात रेती माफियांकडून रेती तस्करी होत असल्यामुळे महसूल व पोलिस प्रशासनाकडून रेती गडकरींवर आळा घालण्यासाठी रात्रीचे सुमारास नदी परिसरातील गावात पेट्रोलिंग केली जाते. शुक्रवारी रात्री लाखांदूर चे नायब तहसीलदार धकाते महसूल कर्मचाऱ्यांसह रात्रीचे पेट्रोलिंगवर असताना नांदेड आणि खैरी/पट येथे स्वराज कंपनीचे २ ट्रॅक्टर ट्रॉलीचे साहाय्याने रेतीची वाहतूक करतांना निदर्शनास आले. त्यांना थांबवून रेती वाहतुकीच्या रॉयल्टीबाबद विचारणा केली असता दोन्ही ट्रॅक्टर चालकांनी रेती वाहतुकीची रॉयल्टी नसल्याचे सांगितल्याने दोन्ही ट्रॅक्टर जप्त करून नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. या कारवाईने रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
0 टिप्पण्या