Ticker

6/recent/ticker-posts

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड ; ६ जणांना रंगेहात पकडले

मासळ येथील घटना ; लाखांदूर पोलिसांची कारवाई

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :-  रात्रीच्या सुमारास सार्वजनिक चौक परिसरात अवैधरित्या जुगार अड्ड्याचे आयोजन करून पैशाच्या हार जितची बाजी लावल्याच्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी धाड टाकून ६ जणांना रंगेहात पकडुन २ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना गुरुवार(ता.१३जून) रोजी रात्री ८:०० वाजता दरम्यान मासळ, ता. लाखांदूर येथे उघडकीस आली. महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये स्वप्निल मेंढे(३५), कमलेश पिल्लेवान(२८) रा. मासळ, सुबोध धनविजय(३५), संभा बुराडे(५९) रा. सरांडी/बु. मदन शेंडे(३४) रा. घरतोडा, राजहंस बारसागडे(४९) रा. बेलाटी यांचे विरोधात लाखांदूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                मासळ येथे सार्वजनिक चौक परिसरात गुरुवारी रात्रीचे सुमारास अवैधरित्या जुगार सुरू असल्याच्या गोपनीय माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक अनिल मांदाडे, पोलीस हवालदार संतोष चव्हाण, पोलीस अंमलदार अनिल राठोड, निलेश चव्हाण, अनिल साबळे यांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकून ६ इसमांना रंगेहात पकडून त्यांचेकडून २ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून  ६ जुगाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक सचिन पवार यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या