विठ्ठल पाटील लातूर
लातूर :-पावसापासुन घरादारासह अन्न,धान्य आदींचे रक्षण करण्यासाठी उपयोगी पडणा-या ताडपञी / प्लास्टिकला ग्राहकांची पसंती असल्याने ताडपञी खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे चिञ हंडरगुळीच्या मार्केट मध्ये दिसते.
पावसापासुन घरादारासह शेतपिकांचे रक्षण करण्यासाठी तसेच गोठ्यावर व घराच्या छतावर झाकण्यासाठी अत्यंत फायदेशीर व परवडेबल असे असलेल्या ताडपञीच्या खरेदीसाठी मध्यमवर्गीय,गरीब कुटूंबियांसह सर्व इच्छूक येथील बाजार पेठेत गर्दी करत असुन,यात १८x२४ = ५०० ₹
२०x३० = १००० ₹ , १५x२० = ४५० ₹ ; १२x१८ = ३०० ₹ , १० x २० = २५० ₹ असा ताडपञीचा दर असुन वाॅटर प्रूफ मेनकापड ही येथे मिळते.व हा सर्व माल मुंबई येथून आणतोत.तसेच हंडरगुळी,उदगीर व अहमदपुर आदी ठिकाणच्या बाजारा मध्ये आम्ही ताडपञी योग्य दरात विक्री करत आहोत.अशी माहिती विक्रेते तानाजी पौळ , क्रिष पौळ , व नामदेव जोगदंड,विशाल जोगदंड यांनी आमचेशी बोलताना दिली आहे.
0 टिप्पण्या