जन आक्रोशाची दखल: लहान व्यवसायकांनाही यामधून वगळले
श्रीकांत बारहाते चित्रा न्युज
हिंगोली:-मागील काही दिवसांपासून विजेच्या स्मार्ट मीटर विरोधात सुरू असलेल्या जन आक्रोशाची दखल राज्य सरकारने घेतली आहे.
घरगुती वापरासाठी स्मार्ट मीटर लागू केले जाणार नाहीत.
त्यासाठी पूर्वीचीच पद्धत कायम राहील असे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी जाहीर केले आहे.
मुंबईत शुक्रवारी भाजपच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये फडणवीस यांनी सामान्य विज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाहीत. असे स्पष्ट केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीनंतर अशी माहिती पत्रकारांना दिली.
त्यामुळे आता घरगुती आणि लहान व्यवसायकांसाठी स्मार्ट मीटर न लावता ते केवळ औद्योगिक आणि मोठ्या वीज ग्राहकांसाठी ते लावले जातील असे स्पष्ट झाले आहे.
-2.16 कोटी सर्वसामान्य ग्राहकाकडे बसविण्यात येणार होते स्मार्ट मिटर.
-25.6 लाख औद्योगिक व मोठ्या ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसविण्यात येणार,
-चार कंपन्यांना देण्यात आले हे होते कंत्राट
स्मार्ट मीटरचे कंत्राट, आदानी पावर, जीनस कंपनी, एनसीसी कंपनी, मोंटेनकार्लो या कंपनींना देण्यात आले होते. येत्या आठवड्याभरात मीटर बसवण्यास सुरुवात होणार होती.आता मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेमुळे सामान्य वीज ग्राहकांकरिता स्मार्ट मीटर लावली जाणार नाहीत. हे देखील यावेळी स्पष्ट झाले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आधीच स्मार्ट मीटर विरोधात नाराजीचे सूर उमटले होते, वीज ग्राहक आणि वीज कर्मचाऱ्यांमध्येही् याबाबत रोष व्यक्त होत होता.
या मीटरमुळे विजेचे बिल अधिक येईल असा काहींचा दावा होता.
सध्याच्या पद्धतीत वीज कर्मचारी रीडिंग घ्यायचे वीज बिलांचे वाटप करायचे, त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यावर स्मार्ट मीटर मुळे गदा येईल असे कर्मचारी संघटनांचे एकंदरीत म्हणणे आहे.
0 टिप्पण्या