रवी भोंगाने साकोली
साकोली,:-विहीर चोरीला गेल्याचे प्रकरण आपण मकरंद अनासपुरेच्या " जाऊ तिथे खाऊ " या मराठी चित्रपटात बघितले. त्यानंतर घरकुलचोरीला गेल्याच्या बातम्या अपल्या वाचण्यात आल्या आहेत.अता मात्र समाज मंदिरच चोरीला गेल्याचे वृत्त हाती लागले आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले समाज मंदिर शोधून द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे शासनाकडून बांधण्यात आलेल्या एखाद्या इमारतीचे आयुष्य किती यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कुंभली येथील दुर्गाबाई डोह परिसराकडे पर्यटन स्थळ म्हणून बघितले जाते. पर्यटकांना विश्रांती करता यावी यासाठी येथे काही वर्षांपूर्वी आमदार निधीतून जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून समाज मंदिराचे बांधकाम करण्यात आले. सदर समाज मंदिर उपविभागीय अभियंता बांधकाम विभाग साकोली यांनी ग्रामपंचायतची कुठलीही रीतसर परवानगी न घेता समाज मंदिर पाडले. आता प्रश्न हा येतो आधीचे बांधकाम बोगस होते काय? काही वर्षापूर्वी बांधन्यात आलेले समाज मंदिर चोरीला गेले ते शोधून द्यावे ही मागणी गावकऱ्यांनी केली आहे.


0 टिप्पण्या