रुपाली डोंगरे चित्रा न्युज
छत्रपती संभाजीनगर:-डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीच्या सर्व अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रियाही ऑनलाईन पध्दतीने सुरु आहे. बारावीनंतरच्या या सर्व अभ्यासक्रमांसाठी आता २९ जूनपर्यंत नोंदणी करण्यात येणार आहे.
बारावीचा निकाल २१ मे रोजी घोषित करण्यात आला. त्यानंतर पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली. पदवी अभ्यासक्रमांसाठी ३० मे ते १४ जून या दरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी मुदत देण्यात आली होती . तथापि प्रवेश प्रक्रिया समितीची बैठक होऊन मुदतवाढ देण्यात आली .या संदर्भात कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवेशाबाबतचे माहितीपुस्तक, अभ्यासक्रमाची यादी, प्रवेशाबाबतचे शैक्षणिक शुल्क, पदवी, पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम, विशेष पदवीका अभ्यासक्रम, प्रमाणपत्र अभ्यासक्रम, विद्याशाखेनिहाय प्रवेशाबाबतची निर्धारित पात्रता, प्रवेशाबाबत चे अध्यादेश, नियम, नियमके, परिनियम, पात्रता आवेदन पत्र स्वीकारणे बाबत अंतिम दिनांक व इतर बाबीची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
पदवी, पदविका ५८ अभ्यासक्रम
कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पदवीका व पदवी असे एकूण ५८ अभ्यासक्रम विद्यापीठात सुरु आहेत. यामध्ये बी.व्होक ऑटोमोबाईल व इंडस्ट्रीयल ऑटोमेशन, बी.ए .(एमसीजे), बॅचलर ऑफ जर्मन - फ्रेंच, चायनीज, प्रिंटीग टेक्नॉलॉजी, बी.पी.ए., योगा, बीएफ ए, बी.टेक, डी.टी.एल, बी.डी. आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
पदवी अभ्यासक्रमासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन पदव्यूत्तर विभागाचे उपकुलसचिव डॉ.आय.आर.मंझा यांनी केले आहे .
0 टिप्पण्या