मोठी दुर्घटना घडल्यावरच संबंधित
यंञणा घेणार का "अॅक्शन" ??
विठ्ठल पाटील लातूर
लातूर:-संबंधित यंञणेच्या दुर्लक्षामुळे हाळी- हंडरगुळी (ता.उदगीर) येथील तिरु नदीचे पाञ दुषित झाले आहे.तसेच या नदीत विविध जातीच्या झाडांनी आपले बस्तान मांडले असल्याचे चिञ दिसत आहे.यामुळे महापुराचा धोका निर्माण झाला आहे.आणि या नदीच्या दुरावस्थेबद्दल वेळोवेळी बातमीद्वारे आवाज उठविला तरीपण "कुंभकर्णा" पेक्षाही गाढ झोपलेल्या संबंधित अधिकारी महाशयाला जाग कांही येईना.आणि म्हणुन जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असलेल्या "मॅडम" ह्या तरी या नदीपाञाची पाहणी करुन योग्य तो निर्णय घेतील.का? एखादी दुर्घटना घडल्यावरच त्यांच्यासह सं- यंञणा झोपेतुन उठणार . याकडे या गावांचे लक्ष लागले आहे .
दरम्यान नदीपाञात वाढलेल्या झाडी झुडपांमुळे पुरांचा धोका वाढला आहे व या नदी किनारी असलेल्या वस्ती मधील लोकांचे जिवन "डेंजर झोन" मध्ये आले आहे.यात शंका नाही .
हाळी-हंडरगुळीसह या परिसरातील असंख्य गावासह शेती करीता जिवनवाहिनी असलेल्या तिरु मं.प्रकल्पातील नदीपाञात विविध प्रकारची झाडे,झुडपे वाढली आहेत. तसेच येथे सा.बां.जागेवर अतिक्रमण करुन थाटलेल्या अवैध माॅंस विक्री सेंटर्सवाले माॅंस,मटनाचे रक्त व वेस्ट साहित्य या पाञात टाकतात.यामुळे हे पाञ दुषीत होऊन सर्वदुर दुर्घंधी पसरते.अशा या प्रकारामुळे तिरु नदी पाञाचे पाविञ्य धोक्यात आले आहे. या कारणांमुळे नदीला महापुराचा धोका निर्माण झाला असुन नदीतील अडथळ्यामुळे भविष्यात महापुराचा फटका परिसरातील घरांना बसणार ! अशी भिती जनता व्यक्त करत आहेत या जुन मध्ये आजवर चांगला पाऊस पडला असुन जुलै,आॅगस्ट,सप्टेंबर २०२४ मध्ये ही मोठ्या पावसाचा अंदाज संबंधित खात्याचा आहे.तिरु नदीपाञात लहान,मोठी हजारो झाडी झुडपे वाढल्याने या पावसाळ्यात पाणी वाहून जाण्यासाठी मोठमोठे अडथळे तयार झालेत.यामुळे येत्या कांही दिवसात महापुर आला तर त्या पुराचे पाणी गावात विशेषत: नदीच्या किनारी असलेल्या घराघरांमध्ये घुसू शकते.आणि यामुळे मोठी दुर्घटना घडू शकते.म्हणुन याबद्दल वेळोवेळी पेपरातुन आवाज उठविला तरी पण याकडे संबंधित यंञणा लक्ष द्यायला तयार नाही.जिल्हा पुर नियंञण व दक्षता तसेच आपत्ती व्यवस्थापन संबंधी बैठकीत नदी लगतच्या वस्त्या व गावांना सावधानतेचा इषारा देण्या -पलीकडे जिल्हाधिकारी कार्यालय करते तरी काय?तसेच हाळी आणि हंडरगुळीत एखादी दुर्घटना घडावी. अशी इच्छा संबंधित यंञणेची आहे का?तसेच "मंञी संजय बनसोडे" हे तरी याकडे लक्ष देतील का?असे प्रश्न येथील नदीपाञाची दुरावस्था बघून जनता विचारीत आहेत..
0 टिप्पण्या