Ticker

6/recent/ticker-posts

हिमायतनगर तालुक्यात करंजी जवळ राष्ट्रीय महामार्गावर रक्तबंबाळ होऊन युवक गंभीर......



लिंगोजी कदम चित्रा न्युज
नांदेड :-हिमायतनगर  तालुक्यातील मौजे करंजी ते सरसम पुलावरील साईड भीतीच्या मध्ये रक्तबंबाळ अवस्थेत तरुण युवक आढळून आला आहे तात्काळ पोलिसांनी त्यास हिमायतनगर येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविले आहे गंभीर जखमी युवक हिमायतनगर तालुक्यातील मौजे पवना येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले असून युवकाचे नाव आशिष साईनाथ जाधव वय 28 आहे ही घटना मध्यरात्रीला घडली असल्याचे दिसत असून या घटनेचा तपास नांदेड ग्रामीण येथून आलेले प्रभारी पोलीस निरीक्षक अमोल भगत सरसम बीट चे जमादार कदम हे करत आहेत. ही घटना कुण्या कारणाने झाली व का झाली याबाबत घटनास्थळी उपस्थित नागरिकांतून चर्चा केली जात आहे. दरम्यान पोलिसांना संपर्क साधला असता पोलीस म्हणाले की जखमी युवकाला प्राथमिक उपचार करून नांदेडला आलेले आहे त्याची प्रकृती बरी झाल्यानंतर दिलेल्या जबाबानंतर ही घटना कशामुळे घडली याचा खुलासा होणार आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर भोकर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मौजे सरसम ते करंजी मधोमध असलेल्या फुलावरील साईड भीतीच्या मध्ये रक्तबंबळ अवस्थेत तरुण युवक आढळून आला आहे घटनास्थळी पोलीस पोचली असून घटनास्थळाचा पंचनामा करून पाहाणी केली असता दुचाकी चपला व हातोडी आली असून कोणीतरी अज्ञाताने कोणत्यातरी कारणास्तव मारहाण केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या