Ticker

6/recent/ticker-posts

विज कोसळून मृत्यू पावलेल्या चामोर्शी तालुक्यातील शंकरपुर (हेटी) व कुनघाडा रै.(गोवर्धन) येथे इसमाच्या कुटुबियांची मा.खा.अशोक जी नेते यांच्याकडून सांत्वन भेट.व आर्थिक मदत

संघदीप मेश्राम चित्रा न्युज 
चामोर्शी:- दोन दिवसापुर्वी जिल्ह्यातील काही ठीकाणी मेघ गर्जना वादळी वाऱ्यासह गारपीट होऊ पाऊस पडला.  

यात चामोर्शी तालुक्यातील शंकरपुर (हेटी) येथील वैभव चौधरी (वय २१ वर्ष)  व कुनघाडा रै.(गोवर्धन) येथील गुरूदास मणिराम गेडाम (वय ४२ वर्ष ) ह्या दोन इसमाचा काल दि.६ जून ला सांयकाळ दरम्यान गावालगत च्या शेतात अचानक विज कोसळून मृत्यू झाला. या संबधीतची माहीती मिळताच मा.खा.अशोक जी नेते यांनी मृत्यू पावलेल्या इसमाच्या कुटुबियांची भेट घेऊन सांत्वना करत यावेळी आर्थिक मदत केली.

याप्रसंगी मा.खा.अशोकजी नेते यांनी नागरिक बंधूभगिनी  विज गर्जना, गारपीट व वादळसह पाऊस आल्यास नागरिकांनी घराबाहेर पडू नये. सध्या विजेचे कोसळण्याचे प्रमाण वाढले असून नागरिकांनी सतर्कता बाळगत काळजी घेण्याचे आवाहन करत तहसीलदार प्रशांत गोरूडे यांना दूरध्वनी द्वारे फोन करुन मृत्यू पावलेल्या इसमाच्या कुटुंबियांना लवकरात लवकर मदत देण्याचे निर्देश देत तसेच गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयातील होत असलेल्या रुग्णांच्या गैरसोयी बाबत नागरिकांनी दर्शविल्या समस्या बद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. खंडाते यांना सुद्धा याप्रसंगी मा.खा.अशोक जी नेते यांनी सुचना केल्या.

 यावेळी किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिष पिपरे, तालुकाध्यक्ष आनंद भांडेकर,जेष्ठ नेते माणिक कोहळे,आदिवासी मोर्चा चे रेवनाथ कुसराम,सोशल मिडिया प्रमुख रमेश अधिकारी, तोताजी आभारे, नेमाजी पा.चौधरी,अरुन किरमे  तसेच मोठ्या संख्येने गावातील नागरिक बंधूभगिनी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या