राकेश आसोले चित्रा न्युज
सोलापूर : "लोकांनी जरी मला स्वीकारले असले तरी काही पुढाऱ्यांनी अजूनही माझं नेतृत्व स्वीकारलेले नाही," असे म्हणत सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी जाहीर सभेतून खंत व्यक्त केली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात आयोजित कृतज्ञता मेळाव्यात त्यांनी हे विधान केले.
प्रणिती शिंदे यांनी आपल्या वडिलांसोबतची कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाले, "कल आज और कल असं कधीही न संपणार नेतृत्व सुशीलकुमार शिंदे आपण आहात. इथे स्टेजवर बसलेल्या अनेकांना तुम्ही घडवणारे नेतृत्व आहात, किंगमेकर आहात."
प्रणिती शिंदे यांनी आपल्या भाषणातून त्यांच्या वडिलांच्या योगदानाचे कौतुक केले आणि त्यांच्या नेतृत्वात घडलेल्या अनेक नेत्यांची आठवण करुन दिली.
0 टिप्पण्या