राकेश आसोले चित्रा न्युज
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी पोलिस प्रशासनाने सज्जता दर्शवली आहे. या सणादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे.
शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देत सण शांततापूर्ण साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. पोलीस उपविभागीय अधिकारी विवेक पाटील यांनी या बैठकीत मार्गदर्शन केले आणि सर्व नागरिकांना सण साजरा करताना शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन केले.
विवेक पाटील म्हणाले, "बकरी ईद सणादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. सर्व नागरिकांनी सहकार्य करून हा सण शांततेत साजरा करावा."
0 टिप्पण्या