Ticker

6/recent/ticker-posts

अभियांत्रिकी पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

रवी भोंगाने साकोली 
साकोली :-इयत्ता दहावी व बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला.दहावी, बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे काय करायचे ? असा प्रश्न विद्यार्थी व पालक यांच्यासमोर असतो.  बदलत्या युगात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षणाकडे वळले पाहिजे यासाठी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ नेहमीच प्रयत्नशील असते.  तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे दहावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमाच्या शैक्षणीक वर्ष २०२४-२०२५ करिता  प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश नोंदणी दिनांक २९ मे, २०२४ पासून सुरू झालेली आहे. बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी थेट द्वितीय वर्ष प्रवेश नोंदणी दिनांक १२ जून,२०२४  पासून सुरू होत आहे.
अभियांत्रिकी पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीभूत पध्दतीने होत असून प्रवेश निश्चीती तीन फेऱ्यामध्ये पूर्ण केली जाते.  पदविका प्रवेश नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी http://dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी Post S.S.C. Diploma या टॅबचा वापर करून प्रथम वर्षासाठी नोंदणी करावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी Direct Second Year या टॅबचा वापर कनू थेट पध्दतीचा वापर करण्यात येतो.  पहिल्या पध्दतीत प्रत्यक्ष स्क्रुटीनी करून जवळच्या सविुधा केंद्रावर (FC सेंटर) आपल्या फॉर्मची पळताळणी करता येते.  तर दुसऱ्या ई-स्क्रुटीनी मोडमध्ये घरुनच सर्व कागदपत्र अपलोड करून फॉर्मची नोंदणी करता येऊ शकते.  प्रवेश नोंदणी अर्जासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४०० रुपये असून, राखीव प्रवर्गासाठी ३०० रुपये नोंदणी शुल्क आकरण्यात येते. शासकीय तंत्रनिकेतन, साकोली ही भंडारा जिल्ह्यातील एकमेव अग्रगण्य शासकीय संस्था असून, सदर महाविद्यालयात सिव्हील इंजीनिअरींग, मेकॅनीकल इंजीनिअरींग, इलेक्ट्रीकल इंजीनिअरींग, कॅम्प्युटर टेक्नॉलॉजी व इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलीकॅम्युनिकेशन इंजीनिअरींग अशा ५ विद्याशाखा उपलब्ध आहेत.  वरील ५ विद्याशाखापैकी ४ विद्याशाखांना राष्ट्रीय मानांकन प्राप्त असून दरवर्षी नांमाकीत कंपन्याची कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून नौकरीच्या संधी उपलब्ध आहेत.  महाविद्यालयात प्रवेशीत विद्यार्थ्यांसाठी मुलींचे व मुलांचे वसतिगृहाची व्यवस्था उपलबध असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे प्राचार्य, श्री. एस. पी. लांभाडे यांनी केलेले आहे.
शासकीय तंत्रनिकेतन, साकोली येथे विद्यार्थ्यांच्या सोईसाठी व मार्गदर्शनासाठी सुविधा केंद्राची (FC सेंटर) स्थापना करण्यात आली असून दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी संस्थेला प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या प्रवेश नोंदणीसंदर्भात काही अडचणी असल्यास सुविधा केंद्राचे समन्वय प्रा. डॉ. अश्विन मेश्राम व श्री. आर. बी. साठे यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन संस्थेचे प्राचार्य श्री. एस. पी. लांभाडे यांनी केलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या