Ticker

6/recent/ticker-posts

सुशिलकुमार पावरा यांच्या ५०१ व्या उपोषणानंतर मतदारांना पैशे वाटणा-यांची झाली चौकशी


रुपाली मेश्राम चित्रा न्युज 
नंदूरबार : शहादा तालुक्यातील भोंगरा या गांवात मतदानाच्या दिवशी खुलेआम पैसे वाटणा-या विडीओतील भोंगरा येथील  लोकनियुक्त सरपंच दिनेश छोटूसिंग चव्हाण, शांतीलाल शंभू पावरा (बर्डे) , कैलास बलजी भामरे ,उदयसिंग फत्तेसिंग चव्हाण या व्यक्तींवर गुन्हा दाखल करून अटक करा,या मागणीसाठी नंदूरबार लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार तथा बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर ५०१ वे उपोषण छेडले.दरम्यान उपोषणाची दखल घेत जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी मतदारांना पैशे वाटणा-यांची चौकशीचे आदेश सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शहादा विधानसभा मतदारसंघ यांना दिल्याबाबतचे पत्र उपोषण कर्ते सुशिलकुमार पावरा यांना दिले.त्यानंतर सुशिलकुमार पावरा यांनी आपले उपोषण स्थगित केले.
                    नंदुरबार लोकसभा मतदारसंघात निवडणूक मतदान कार्यक्रमाच्या दरम्यान दिनांक १३ मे २०२४ रोजी शहादा तालुक्यातील भोंगरा येथील लोकनियुक्त सरपंच व इतर काही व्यक्तींनी मतदारांना खुलेआम पैसे वाटप करत असल्याचा विडीओ वाॅटसप ग्रूपवर वायरल होत आहे.मतदारांच्या हातात २०० रूपयाच्या २ नोटा असे  ४०० रूपये  पैसे देऊन फुलवर म्हणजेच कमळावर मतदान करा, नाहीतर तुम्हाला पुढच्या वेळेस पैसे देणार नाहीत, कमळावरच मतदान करा,अशी धमकी सदर इसम देत आहेत.फुलावर मतदान करा असे म्हणत असल्याने सदर सरपंच व व्यक्ती हे भाजप पक्षाकडून पैसे वाटप करीत असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येते .आपल्या पार्टीच्या उमेदवारांना मतदान करावे,म्हणून या लोकनियुक्त सरपंचाकडून व व्यक्तींकडून पैसे वाटून मतदारांना आमीश दाखवून पैशांची लाच देण्याचा गंभीर प्रकार घडला आहे.लोकशाहीला काळीमा फासणारा हा प्रकार भोंगरा येथे घडला आहे.पैसे देऊन मतदान करायला लावून अशी लोक लोकशाहीची हत्या करीत आहेत. मतदारांना कोणत्याही प्रकारची लाच देणे,पैसे देणे,आमीश दाखवणे,धमकावणे हा गुन्हा आहे.तरी सदर विडीओची सखोल चौकशी करून संबंधित लोकनियुक्त सरपंच व इतर व्यक्तींवर गुन्हा नोंद करून तात्काळ अटक करण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली.त्यानुसार दिनांक ११ जून २०२४ रोजी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शहादा यांनी या प्रकरणाची सुनावणी आयोजित करून संबंधितांची चौकशी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या