Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या युवक तालुका कार्याध्यक्ष पदी अमोल माने यांची निवड

सोमनाथ खंडागळे सोलापूर
सोलापूर:-माळशिरस तालुक्यासह अकलूज शहरातील सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ  ह्युमन राईट्सच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्न मार्गी लावण्यात हिरेरीने झटणारे सामाजिक कार्यकर्ते अमोल बाळासाहेब माने यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे युवक माळशिरस तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने-पाटील यांच्या उपस्थितीत युवक ता.कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.

सन २०१६ रोजी श्री माने यांच्या मातोश्रींनी  अकलूज ग्रामपंचायत निवडणुकीत निर्णायक मते घेत प्रस्थापितांविरुद्ध कडवी झुंज दिली आहे. मार्च २०२४ रोजी मात्र त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (राशप) प्रवेशानंतर त्यांच्यावर आज युवक ता.कार्याध्यक्ष पदाची वर्णी लागली आहे.पक्षाचे अध्यक्ष आद.शरदचंद्र पवारसाहेब यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी आहोरात्र प्रयत्न करणार असून लवकरच युवकांची मोठ बांधून पक्ष संघटन मजबूत करणार असल्याचे युवक ता.कार्याध्यक्ष अमोल माने यांनी निवडीनंतर आपले मत व्यक्त केले . या निवडी दरम्यान माळशिरस विधानसभा कार्याध्यक्ष मोहसिन शेख, माळशिरस मुस्लिम समाजाचे अध्यक्ष अजिमभाई मुलाणी, आदी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या