रुपाली मेश्राम चित्रा न्युज
भंडारा:जागतिक योग दिना निमित्त योग प्रशिक्षण शिबिर (१५ ते २१ जून २०२४) साजरे करण्यात आले असून १५ जून रोजी योग दिनाचे उद्घाटन मा आमदार श्री नरेंद्र भोंडेकर यांचे हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री नरेंद्र व्यवहारे,प्रमुख अतिथी म्हणून इश्र्वरलाल जी काबरा,श्रीमती काबरा मॅडम,उद्योजक अभय(बाल्या)भागवत,महादेव बांगडकर,योगवृत्ती शाम कुकडे, भारत स्वाभिमान ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ रमेश खोब्रागडे,सदानंद इलमे, मो. सईद शेख ई मान्यवर पाहुणे उपस्थित होते.दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.नवीन योगशेड रूम चे फित कापून मान्यवर हस्ते उद्घाटन करण्यात आले. पाहुण्यांचे वृक्षरोपे देवून स्वागत करण्यात आले. शाम कुकडे यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये सांगितले की या योग गार्डन मधे योग साधकांकडून केवळ योग,प्राणायाम चे धडेच गिरविले जात नाहीत अपितु रंगोत्सव,गुरुपौर्णिमा,राष्ट्रीय दिवस,कोजागिरी, सहली,जन्मदिन ,दरवर्षी विश्व योग दिंन ई चे ही भरगच्च आयोजन पतंजली योग समिती (मिस्कींन गार्डन) तर्फे केले जाते.उद्घाटक नरेंद्र भोंडेकर यांनी योगसाधक तथा ज्येष्ठांना हीलाभ घेता यावा या करिता इथे एक चांगले विरंगुळा केंद्र,नवीन शेड सोबत विस्तारित कामे,२मजली इमारत बांधकाम,एक नवीन स्वरूपाचे व हिरवळीने युक्त असे मिस्कीन टैंक गार्डन साकार करून याचे नाव बदलून संभाजी योग उद्यान करण्यात येणार आहे असे प्रतिपादन केले.पुढे त्यांनी भंडारा शहरात मोठ्या प्रमाणात खामतलाव,सागर तलाव,गोखले उद्यान,हुतात्मा स्मारक गार्डन,सौंदर्यकर्णाची कामे, नाल्या,सिवरेज,जलसिंचन ई चे कोट्ट्यावधीचे कामे सुरू असून नागपूर शहर प्रमाणे सुंदर असे भंडारा शहराचे विकास होवू शकते या करिता सदैव सकारात्मक दृष्टिकोन ठेवूनच अशी विकास कामे होवू शकतात असे ही मानस त्यानीं व्यक्त केले. या प्रसंगी
डॉ.नरेंद्र व्यवहारे, डॉ.रमेश खोब्रागडे,यांनी जागतिक योग दिनाचे महत्व कळवून दिले,अभय भागवत,इश्वरलाल काबरा,महादेव बांगडकर,सदानंद इलमे, शेख इत्यादींनी ही मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्र संचालन अतुल वर्मा यांनी केले तर आभार पुरुषोत्तम वैद्य यांनी मानले . मोठया संख्येने योग साधक, साधिकांची उपस्थिती होती.२१ जून पर्यंत सुरू प्रशिक्षण शिबिर चा लाभ जास्तीत जास्त संख्येने घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या