Ticker

6/recent/ticker-posts

सिमेंट काँक्रिट नाली बांधकाम झाकणासह निकृष्ट प्रतीचे


• मुरमाडी प्रभाग क्रमांक ६ मधील प्रकार

• सामाजिक कार्यकर्ता निलेश गाढवे यांची चौकशीची मागणी

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
 भंडारा :- ग्रामीण परिसरात पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून या करिता अनेक योजनांचे माध्यमातून आवश्यक तो निधीही उपलब्ध करतो. पण क्रियान्वयन यंत्रणेच्या उदासीन धोरणामुळे फलनिष्पत्ती होत नाही. याचा प्रत्यय ग्रामपंचायत मुरमाडी प्रभाग क्रमांक ६ मध्ये आला. कनिष्ठ अभियंता व कंत्राटदाराचे संगनमताने सिमेंट काँक्रिट नाली बांधकामात साहित्याचा अल्प प्रमाणात वापर करण्यात आल्याने बांधकाम निकृष्ट प्रतीचे झाले आहे. असा सामाजिक कार्यकर्ता निलेश गाढवे यांनी आरोप केला असून चौकशीची मागणीही केली आहे. 
                        ग्रामपंचायत मुरमाडी प्रभाग क्रमांक ६ येथील मुख्य रस्त्यालगत सांडपाणी वाहून जाणारी नाली नसल्यामुळे पावसाचे पाणी साचून त्यापासून डास निर्मिती होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. परिसरातील जनतेच्या मागणीवरून रोशन वालदे यांचे घरापासून ते रंजन बावनकुळे यांचे घरापर्यंत लेखाशिर्ष १५वा वित्त आयोगातून सिमेंट काँक्रिट नाली बांधकाम झाकणासह ह्या ६ लक्ष ५०हजार रुपये अंदाजपत्रकिय रकमेच्या बांधकामास आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये मंजुरी प्रदान करण्यात आली. करारनामा ग्रामपंचायतीचे नावे असून यावर तांत्रिक मार्गदर्शन, देखरेख व सनियंत्रणाचे काम पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता डी.जी. राघोर्ते यांचेकडे सोपविण्यात आले होते. असे सामाजिक कार्यकर्ता निलेश गाढवे यांचे म्हणणे आहे. 
                         नियोजन पठाण यांचे घरापासून ते रंजन बावनकुळे यांचे घरापर्यंत झाकणासह सिमेंट काँक्रिट नाली बांधकाम असताना रोशन वालदे ते रंजन बावनकुळे यांचे घरापर्यंत प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. तर नाली बांधकामाचे पूर्वेला लेआऊट असून या लेआऊट मालकाचा फायदा होण्याकरिता काही जागा सोडण्यात येऊन सिमेंट काँक्रिट नाली रस्त्यालगत करण्यात आल्याने रस्ता अरुंद झाला असल्याचे सामाजिक कार्यकर्ता निलेश गाढवे यांचे म्हणणे आहे. करारनामा ग्रामपंचायतीचे नावाने असला तरी टक्केवारी हे काम एका ग्रामपंचायत सदस्यास देण्यात आले होते. त्याने कनिष्ठ अभियांत्याशी संगनमत करून सिमेंट काँक्रिट नाली बांधकामात साहित्याचा अल्प प्रमाणात वापर केल्याने बांधकाम निकृष्ट प्रतीचे झाले आहे. तसेच ज्या बाजूला उतार आहे. त्या बाजूला योग्य लेवलने सिमेंट काँक्रिट नाली तयार केली गेली नसल्यामुळे पाण्याची निकासी न होता नालीतच पाणी साचणार आहे. त्यामुळे डासांची पैदास होऊन या परिसरातील रहिवाशांना आरोग्य विषयक समस्येला सामोरे जावे लागणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ता निलेश गाढवे यांचे म्हणणे आहे. मुरमाडी प्रभाग क्रमांक ६ मधील रोशन वालदे ते रंजन बावनकुळे यांचे घरापर्यंत नाली बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असून या बांधकामाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या