राकेश आसोले चित्रा न्युज
सोलापूर : बार्शी विधानसभा क्षेत्राचे सदस्य श्री. राजेंद्र विठ्ठल राऊत यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासकांना पत्र लिहून कै. आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज मर्यादेत वाढ करण्याची मागणी केली आहे. सध्या या महामंडळातर्फे मराठा समाजातील युवकांना उद्योजकता प्रोत्साहनासाठी रु. २ लाखांचे कर्ज दिले जाते.
श्री. राऊत यांनी त्यांच्या पत्रात नमूद केले आहे की, "सध्याची रु. २ लाख कर्जाची रक्कम मराठा समाजातील युवकांसाठी अपुरी आहे. समाजातील वाढत्या बेकारीच्या पार्श्वभूमीवर युवकांना स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे कर्जाची मर्यादा वाढवून रु. १० लाख करण्याची विनंती करतो."
या मागणीने मराठा समाजातील युवकांना अधिक साहाय्य मिळू शकते, असे श्री. राऊत यांचे मत आहे. त्यांनी या मागणीला तात्काळ मंजुरी देण्याचे आवाहन केले आहे.
श्री. राजेंद्र विठ्ठल राऊत यांचे कार्यालय बार्शी येथे असून त्यांनी आपल्या पत्र क्रमांक MLA/RR/७८३/२०२४ अंतर्गत ही मागणी केलेली आहे.
या मागणीचा परिणाम काय होईल हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
0 टिप्पण्या