काँग्रेस व मविआ सोबत जे भेटते ते घेवून युती केली असती तर किमान अकोला सिट तरी जिंकली असती व बाळासाहेब खासदार झाले असते.. इत्यादी ज्ञान पाजळणाऱ्या हरीभाऊ व छद्म आंबेडकरी विचारजंतांनो..
आंबेडकर ला आठवले, कवाडे, गवई व इतर स्वार्थी नेत्यांच्या लाईन मधे उभे असलेले बघण्याची तुमची अघोरी मनोकामना कधीच पूर्ण होणार नाही.
हेच लाचारीचे धंदे करायचे असते तर सक्रिय राजकारणात प्रवेश न करताही बाळासाहेब आंबेडकर आजन्म खासदार व केंद्रात कॅबीनेट मंत्री राहले असते. तथा देशाचे राष्ट्रपति सुध्दा झाले असते.
फक्त मौन बाळगायचे होते, प्रस्थापित पक्षांच्या हो मधे हो मिळवायचे होते, समाजाला वाऱ्यावर सोडायचे होते, स्वतः एशोआरामाचे जिवन जगायचे होते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे फक्त भांडवल करायचे होते, इ. फक्त इतके करून खासदारकी, केबिनेट मंत्री व राष्ट्रपति पद भोगायचे होते.
सन १९८४ पासून बाळासाहेब सक्रिय राजकारणात दाखल झाले व काँग्रेस व विशेष म्हणजे काँग्रेसचे तात्कालीन शरद पवार याने नव्याने शोधलेल्या "मोमबत्ती विरूद्ध अगरबत्ती" या जातीयवादी द्वेशपूर्ण फार्मुल्याचा बळी ठरून बाळासाहेब लोकसभा निवडणूक हरले.
पराजय पचवून देखिल बाळासाहेब सातत्याने लढत राहले, आंबेडकरी, बौध्द, भटके विमुक्त, मायक्रो ओबीसी तथा शोषित-पिडित-वंचित घटकांचे नेतृत्व ते करत राहले. त्यांच्या न्याय हक्कांसाठी प्रस्थापित मनुवादी व्यवस्थेशी भांडत राहले.
सन १९९० मधे व्ही. पी. सिंग यांच्यासोबत राजकीय क्रांति घडवून सत्तेत गेले व राज्यसभा खासदार झाले. बौध्दांना अनुसूचित जाति मधे समावेश, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न व इतर सोडवलेले मुद्द सर्वश्रूत आहे.
सन १९९८ मधे एकीकृत रिपाई चे नेतृत्व करत बाळासाहेब काँग्रेस सोबत युती करून लोकसभा खासदार झाले, तथा एकाच वर्षात १९९९ मधे झालेल्या मध्यावधि सार्वत्रिक निवडणूकीमधे काँग्रेस सोबतची युती तुटल्या अंती बाळासाहेब स्वबळावर पुन्हा खासदार झालेत.
त्यानंतर २००४, २००९, २०१४, २०१९ व २०२४ सातत्याने बाळासाहेब लोकसभा निवडणूकीमधे पराभूत होत आहेत. ह्या सर्व कालखंडामधे बाळासाहेबांना एक सिट च्या बदल्यात लोकसभा, राज्यसभा कित्येकदा राजगृहाच्या दरवाज्यावर आली. इतकेच नाही तर राष्ट्रपति पदासाठी सुध्दा विचारणा झाली.
आंबेडकर नावाचं भांडवल करून हे सर्व प्राप्त करणे कोणते कठिन काम होते. पण दारात आलेले पद धूडकावून इतके पराभव स्विकारण्याचा पण तरिही ताठ मानेने स्वाभिमानाने जगण्याचा जो रूबाब आहे ना.. तो फक्त आंबेडकर ला शोभतोय.
बाकी समस्त हरीभाऊ व छद्म विचारजंतांनी काँग्रेस ची गुलामी करतच जगावे व मरावे. भरपूर शुभेच्छा.
@सिध्दांत पाटील Siddhant Patil


0 टिप्पण्या