हर्षवर्धन देशभ्रतार चित्रा न्युज
बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा लोकसभेतील पराभव जिव्हारी लागल्याने आज आणखी एका मुंडे समर्थकाने आत्महत्या केली आहे. हरिभाऊ बडे असे या मुंडे समर्थकाचे नाव असून ते शिरूर तालुक्यातील वारणी येथील रहिवासी होते. त्यांच्या आत्महत्येनंतर गावात शोककळा पसरली आहे.
पंकजा मुंडे यांनी बडे यांच्या अंत्यविधीसाठी उपस्थिती लावली. त्यांच्या आगमनानंतर बडे यांच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला आणि यावेळी पंकजा मुंडेंना देखील अश्रू अनावर झाले होते. मुंडे समर्थकांच्या आत्महत्या लक्षात घेता पंकजा मुंडेंनी अस टोकाचं पाऊल न उचलण्याचे आवाहन केले आहे.
त्या म्हणाल्या, "समर्थकांनी या प्रकारच्या टोकाच्या कृतीला प्रवृत्त होऊ नये. आपला धीर ढळू देऊ नका आणि संघर्ष करत राहा." पंकजा मुंडेंनी या कठीण प्रसंगी बडे यांच्या कुटुंबीयांना धीर दिला.
0 टिप्पण्या