राकेश आसोले चित्रा न्युज
कल्याण : शिवसेनेच्या शिंदे गट व ठाकरे गटाकडून आज दुर्गाडी किल्ला परिसरात घंटानाद आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची सुरुवात टिळक चौकातून झाली असून ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते टिळक चौकात जमा झाले आहेत.
टिळक चौकात शिंदे गटाच्या नेत्यांची भाषणं सुरु असताना ठाकरे गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे.
हे आंदोलन १९८२ पासून दरवर्षी केलं जातं. जेव्हा पासून प्रशासनाने नमाजाच्या वेळी मंदीर बंद ठेवण्याचा निर्णय घेवून एक परिपत्रक काढलं तेव्हा पासून धर्मवीर आनंद दिघे यांनी हे आंदोलन सुरु केलं होतं. हे आंदोलन प्रतीकात्मक असून हिंदू धर्माच्या अधिकारांसाठी लढा देण्यासाठी एक प्रमुख घटक आहे.
विजय साळवे, उपनेता शिवसेना ठाकरे गट, म्हणाले:
"हे आंदोलन आमच्या परंपरेचा एक भाग आहे आणि आम्ही हिंदू धर्माच्या अधिकारांसाठी लढत आहोत. प्रशासनाने हिंदू धर्माचे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे आम्ही हा विरोध करतो."
गोपाल लांडगे, जिल्हाप्रमुख शिवसेना शिंदे गट
0 टिप्पण्या