Ticker

6/recent/ticker-posts

लोकसभा निवडणुकीच्या धावपलीत शासनाने चक्क दिव्यांगाकडे पाठ फिरवली

विजय चौडेकर  चित्रा न्यूज 

नांदेड -:दिव्यांग व्यक्तीना मिळणारी संजय गांधी दिव्यांग पेन्शन योजनेचे मानधन गेली 2महिने झाले दिव्यांग व्यक्तीच्या खात्यावर जमा झालेले नाही. ज्या गरीब गरजू अनाथ उदारनिर्वाह पेन्शन वर होत आहे ते पेन्शन ची आतुरतेने वाट पहात आहे. काही महिन्या पूर्वी महाराष्ट्र शासनाच्यावतीने शासन दिव्यांगाच्या दारी हा उपक्रम राबवला पण महाराष्ट्र राज्यातील किती गरजू दिव्यांगाना या योजनेचा फायदा झाला हा प्रश्न आता दिव्यांगाकडून उपस्थित होत आहे.आमदार व खासदार याच्या पेन्शन मध्ये नेहमीच भरगोस वाढ होत आहे पण दिव्यांगाना महिना 1500रु मिळणारी पेन्शन वेळेवर मिळत नाही. इतर राज्याप्रमाणे 
महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्तींना मिळणाऱ्या पेन्शन मध्ये महाराष्ट्र राज्य सरकार ने वाढ करावी व ती वेळेवर मिळावी या करिता दिव्यांग व्यक्तीसाठी कार्य करणाऱ्या विविध संघटना व संस्था शासनदरबारी दिव्यांगाच्या 
विविध अडचणी संदर्भात पत्रव्यवहार करून निवेदन देऊनही दिव्यांगाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या