Ticker

6/recent/ticker-posts

भेंडी बाजार परिसरात रहिवाशी इमारतीला आग, रेस्क्यू ऑपरेशन सुरू

राकेश आसोले चित्रा न्युज 
मुंबई: मस्जिद येथील भेंडी बाजार परिसरात आज सकाळी एक तीन मजली रहिवाशी इमारतीला भीषण आग लागली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

आगीची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी चार फायर इंजिन आणि तीन टँकर दाखल झाले. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून जखमींना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात येत आहे.

आगीची तीव्रता लक्षात घेता, अधिक फायर इंजिन्स आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरातील रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आगीमुळे झालेल्या नुकसानीचे आणि संभाव्य जीवितहानीचे संपूर्ण आढावा घेण्याचे काम सुरू आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलीस विभाग सतर्क आहेत आणि पुढील तपासणीसाठी घटनास्थळी आहेत. अधिक माहितीची प्रतिक्षा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या